भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्या 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अंधेरीच्या चार बंगला येथील सिद्धार्थ सभागृहात जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव भूषविणार असून माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार चंद्रकांत हंडोरे तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतील.