Homeचिट चॅटप्लाझ्मा एक्स व...

प्लाझ्मा एक्स व एक्सआर ई स्कूटरवरच्या ऑफरला मुदतवाढ

क्वांटम एनर्जी, या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही-EV) स्टार्टअपने प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर या नवीनतम मॉडेल्सवरील मर्यादित वेळेची ऑफर ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. पर्यावरणविषयक जागरूक ग्राहकांच्या प्रचंड मागणीला प्रतिसाद म्हणून ३१ मार्च २०२४ रोजी संपणाऱ्या ऑफरला ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

विशेषत: ३१ मार्च रोजी फेम २ सबसिडीची समाप्ती आणि त्यानंतर ईएमपीएस २०२४ अॅडहॉक योजना सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर, क्वांटम एनर्जीने तिच्या प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर इलेक्ट्रिक स्कूटर्सवर ऑफर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जरी दुसऱ्या योजनेत प्रत्येक टू-व्हीलरसाठी १०,००० रुपयांपर्यंत मर्यादित साहाय्य पुरवले गेले असले तरी, क्वांटम एनर्जी अशा आकर्षक किंमतीचे पर्याय प्रदान करण्यास कटिबद्ध आहे, जे शाश्वत वाहतूक सर्वांसाठी सुलभ करण्यासाठी तिच्या समर्पणास प्रदर्शित करतात. पूर्वी अनुक्रमे १,१९,५२५ रुपये आणि ९९,७५७ रुपये एक्स-शोरूममध्ये सूचीबद्ध असलेल्या या अत्याधुनिक स्कूटर्स आता क्वांटम एनर्जीने १०% सवलतीवर ऑफर केल्या आहेत, ज्यामुळे किंमती अनुक्रमे १,०९,००० रुपये आणि ८९,००० रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत.

एक अतिरिक्त प्रोत्साहन म्हणून, क्वांटम एनर्जी ३० एप्रिलपर्यंत केलेल्या प्रत्येक टू-व्हीलर खरेदीवर ७५,००० रुपयांचे अतिरिक्त फायदे देत आहे. या फायद्यांमध्ये मिंत्रा, पिझ्झा हट, पेटीएम, द मॅन कंपनी यासारख्या आघाडीच्या ब्रँड्सच्या एक्सक्लुझिव्ह ब्रँड ऑफर्स आणि कूपन्सचा समावेश आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी एकंदरीत मूल्यप्रस्ताव वाढला आहे.

क्वांटम एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक चक्रवर्ती सी. म्हणाले की, क्वांटम एनर्जीला मागील महिन्यात आमच्या ग्राहकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत आणि त्यांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही आमची ऑफर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा ठाम विश्वास आहे की, ईव्ही टू-व्हीलर उद्योग त्याच्या कवचामधून बाहेर पडला आहे आणि सरकारी पाठिंब्यामुळे, अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे आमच्यासारख्या ओईएम कंपन्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी स्पर्धात्मक किंमत ऑफर करण्यास सक्षम झाल्या आहेत. पारंपारिक इंधनआधारित वाहनांच्या तुलनेत सर्वात अनुकूल व्याजदर ऑफर करणाऱ्या फायनान्सिंग पर्यायांसह, आमच्या मूल्यवान ग्राहकांसाठी ही एक फायदेशीर परिस्थिती आहे.

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content