Homeटॉप स्टोरीमुख्यमंत्र्यांकडून महाविकास आघाडी...

मुख्यमंत्र्यांकडून महाविकास आघाडी फिसकटण्याचे संकेत?

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद पटकाविणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या दीड वर्षातच महाविकास आघाडीचा हा प्रयोग फसण्याचे संकेत देण्यास सुरूवात केली असल्याचे जाणकारांचे मत आहे.

येत्या वर्षभरात राज्यात होऊ घातलेल्या मिनी विधानसभा निवडणुकांसाठी युती वा महाविकास आघाडीच्या भरवशावर न राहता स्वबळाची तयारी करा, अशा स्पष्ट सूचना शिवसेनेचे पक्षप्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना बळकट करण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले. शिवसेना बळकट करण्यासाठी कामाला लागा, युती किंवा आघाडीची चिंता करू नका. त्याचा निर्णय आम्ही करू, असे ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टीबरोबर युतीत असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तेव्हाही अशाच प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना स्वबळाची तयारी करायला सांगत होते. नंतर त्यांनी युतीत निवडणूक लढून पुढे काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर मोट बांधली व सत्ता हस्तगत केली. आताही ठाकरे महाविकास आघाडीबाबत हीच भूमिका घेत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

पुढच्या वर्षात राज्यातल्या २० महापालिका, ३०० नगरपालिका, २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुका (मिनी विधानसभा) होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना १२ ते २४ जुलै या काळात शिवसंपर्क अभियान राबवण्यास सांगितले. यावेळी खासदार अनिल देसाईही उपस्थित होते. बैठकीनंतर देसाई यांनीच प्रसारमाध्यमांना शिवसंपर्क मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

जनतेची कामे करा. आपला पक्ष बळकट करा. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचतात की नाही याकडे लक्ष ठेवा. प्रत्येक गाव कोरोनामुक्त होत आहे की नाही ते पाहा. लसीकरण होते की नाही, याची खातरजमा करा. यात विधानसभा, तालुका आणि पंचायतनिहाय कामे करणे अपेक्षित आहे. अधिकाधिक गावांमध्ये पोहोचत लोकांशी संपर्क वाढवण्यावर या अभियानात भर द्या, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त कामे करा. शिवसेना ही आपली जबाबदारी आहे. १९६६पासून आतापर्यंत आपण कशाप्रकारे आलो हे जाणून घ्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घराघरात कसा पोहोचेल हे पाहा. निवडणुका येतील आणि जातील. मात्र, लोकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content