Homeचिट चॅटलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात घेतला आढावा

लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक घेण्यात आली.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहिता व कायदा सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना व दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा दैनंदिन अहवाल अद्ययावत ठेवून तो दररोज पाठविण्याबाबत पोलीस उपायुक्त यांनी दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

मुंबई शहर जिल्ह्याच्या बहुतांश सीमा या सागराशी संलग्न असल्यामुळे सागरी सीमा सुरक्षेशी संबंधित कोस्ट गार्ड मेरीटाइम बोर्ड आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याचे तसेच अवैध मद्य वाहतुकीवर नियंत्रण व त्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यादव यांनी दिल्या. मुंबई शहर जिल्ह्याला लागून असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे फ्लाईंग सर्व्हेलन्स टीम (FST), स्टॅटस्टीक सर्व्हेलन्स टीम (SST) यांच्याशी परस्परांमध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी (कायदा व सुव्यवस्था) तेजुसिंग पवार, मुंबई शहर उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, मेरीटाईम बोर्ड उपजिल्हाधिकारी अंजली भोसले आदी उपस्थित होते.

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content