Homeएनसर्कलयुसुफ टीपी राष्ट्रवादीचे...

युसुफ टीपी राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेसने आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राखण्याच्या प्रयत्नात लक्षद्वीपमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित केला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे (एनडीए) राष्ट्रवादीचे युसुफ टीपी हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.

केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुक्यमंत्री अजित पवार यांच्याककडील राष्ट्रवादी काँग्रेसला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिल्यानंतर पवार यांनी राष्ट्रवादीला एनडीएचे घटक पक्ष म्हणून सहभागी केले. आता याच एनडीएकडून राष्ट्रवादी लक्षद्वीपमधून निवडणूक लढवत आहे. २०१९ साली लक्षद्वीपची ही एकमेव जागा तेव्हाच्या अखंडीत राष्ट्रवादीनेच जिंकली होती. राष्ट्रवादीचे महासचिव व केरळचे प्रदेशाध्यक्ष यांनी युसुफ यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवला होता. पक्षाध्यक्ष अजित पवार तसेच कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत संसदीय मंडळाच्या बैठकीत युसुफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content