Homeचिट चॅटश्री गणेशाच्या दर्शनाने...

श्री गणेशाच्या दर्शनाने अमोल कीर्तिकरांच्या प्रचाराला सुरूवात

मुंबईतल्या गोरेगावामधील नागरी निवारा संकल्प गणपती मंदीर येथे दर्शन घेत येथील उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी नुकतीच आपल्या प्रचाराची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांशीही संवाद साधला.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मागिल आठवड्यात गोरेगाव, दिंडोशी व जोगेश्वरी

येथे जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित केली होती.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाव निश्चित झाल्याने पक्षाचे उपनेते अमोल कीर्तिकर यांनी आपल्या प्रचाराला नागरी निवारा संकल्प गणेश मंदिरात दर्शन घेत सुरुवात केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक कट्टा प्लॉट नं. 6 व कृष्णा कावेरी येथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मुंबईचे माजी उपमहापौर  सुहास वाडकर, शाखाप्रमुख संदीप जाधव तसेच वार्ड क्र. 41चे माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, शाखाप्रमुख संपत मोरे व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content