Homeटॉप स्टोरीउद्या मुंबईत पाणीपुरवठ्यात...

उद्या मुंबईत पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात!

पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२पैकी एका रबरी ब्लाडरमध्ये शनिवार, १६ मार्चला अचानक बिघाड झाल्‍याने पाणीगळती सुरू झाली. या ब्लाडरची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१ मीटरपर्यंत खाली आणण्यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला. त्यानंतर बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरूस्‍तीचे काम आज सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यानंतर भातसा धरणातून पुनश्च पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होण्‍याकरिता कालावधी लागणार असल्‍याने उद्या मंगळवारी एका दिवसासाठी संपूर्ण मुंबई महानगराच्‍या पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के पाणीकपात केली जाणार आहे.

भातसा धरणातून सोडण्‍यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्‍ये साठविले जाते. पालिकेच्‍या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्‍ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशयामार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो. भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्‍यात आले आहे. तथापि, धरण ते बंधारा यातील अंतर सुमारे ४८ किलोमीटर आहे. त्‍यामुळे पिसे बंधाऱ्यातील पाणीपातळी वाढण्‍यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही पाणीकपात करण्यात येत आहे. या काळात नागरिकांनी पाण्‍याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रसासनाने केले आहे.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content