Homeचिट चॅटपूजा गोहिलने केला गृहिणीपासून...

पूजा गोहिलने केला गृहिणीपासून विमा सल्लागारपर्यंतचा प्रवास

तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या परिवर्तनीय शक्तीचा दाखला देत मुंबईतल्या पूजा गोहिलने गृहिणीपासून ते विमा सल्लागार होण्यापर्यंतचा तिचा प्रेरणादायी प्रवास नुकताच शेअर केला आहे. संपूर्ण मुंबईत ती मोटर विमा देण्याचे काम करते. तिचा हा प्रवास टर्टलमिंट प्रो ॲपमुळे शक्य झाला. टर्टलमिंट, या अग्रगण्य विमा प्लॅटफॉर्मने पूजाचे आर्थिक स्वातंत्र्य आणि कामाची लवचिकता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पूजाने ऑगस्ट 2019मध्ये टर्टलमिंटसह उद्योजकतेचा प्रवास सुरू केला. सक्षम आणि विश्वासार्ह विमा कंपनी शोधण्यासाठी ती इंटरनेटवर शोध घेत होती. तेव्हा टर्टलमिंटच्या टीमने तिच्या प्रश्नाला केवळ जलद प्रतिसाद दिला नाही तर केवळ 2-3 दिवसात संपूर्ण ऑन-बोर्डिंग प्रक्रियेत संपूर्णपणे मार्गदर्शन केले. विमा ज्ञान नसलेल्या पूजाला टर्टलमिंट ॲपमध्ये अनेक सोयीच्या गोष्टी मिळाल्या. ऍपच्या ट्यूटोरियलने तिला जलद आणि अचूक कोट्स ऑफर करण्यासाठी सुसज्ज केले. विविध नेटवर्कने विविध पर्यायांसह क्लायंटसमोर सादरीकरण करण्याची परवानगी दिली.

युझर फ्रेंडली ट्युटोरिअलसोबतच रिलेशनशिप मॅनेजरकडून मिळालेला महत्त्वपूर्ण पाठिंबा पूजा आवर्जून सांगते. कामाच्या नियमित तासांच्या पलीकडेही त्यांनी पूजाला मदत केली. यामुळे, युझर फ्रेंडली ॲप, पाठिंबा, सहकार्य देणारी टीम यामुळे तिला तिच्या व्यस्त वेळापत्रकातही अखंडपणे काम करण्याची सोय करून दिली. घर चालवण्याच्या जबाबदाऱ्यांमुळे केवळ कामासाठी वेळ मिळणे कठीण होऊन बसते. मात्र, या ॲपमुळे, मला जेव्हाही मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी काम करू शकते, असं पूजा म्हणते.

 प्रवास

ॲपच्या लवचिकतेबाबत बोलताना पूजा सांगते की, हे अतिरिक्त हात असण्यासारखेच आहे. शिवाय, ॲपवर कोट्सदेखील सेव्ह करता येतात, ही अत्यंत चांगली सुविधा आहे. या ऍपच्या सणासुदीच्या डिझाइन्स आणि वैयक्तिक पर्यायांमुळे क्लायंटशी कनेक्ट करणे आणि रिवॉर्ड्स मिळवणे खूप सोपे आहे, असेही ती पुढे म्हणाली. कोविड-19 लॉकडाऊनने स्वतःची आव्हाने उभी केली. परंतु या ऍपच्या वैशिष्ट्यांमुळे, मार्केटिंग साहित्यासह वेळेवर नूतनीकरण स्मरणपत्रे आणि पे-आउट सूचनांमुळे, तिचे काम सुरळीतपणे सुरू राहिले.

इन्शुरन्समध्ये करिअरची आकांक्षा बाळगणाऱ्या इतर महिलांना ॲपची शिफारस करताना पूजा म्हणते की, ज्ञानाचा अभाव अडथळा ठरू शकतो. मात्र, टर्टलमिंटने दिलेले प्रशिक्षण कार्यक्रम आणि समर्थन यामुळे शिकण्याचीही प्रक्रिया अधिक सहज होते. ज्या महिलांना या विषयातील उच्च कौशल्य मिळवायचे आहे, त्यांच्यासाठी मी या प्लॅटफॉर्मची शिफारस करते. कारण ते त्यांना आवश्यक साधने आणि मार्गदर्शनाने सक्षम करते. पूजासारखी कोणतीही महिला या मार्गांद्वारे यश मिळवू शकते आणि त्यांच्या इतर जबाबदाऱ्या सांभाळून, आत्मनिर्भरता आणि आर्थिक सुरक्षिततेची भावना वाढवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकते.

Continue reading

जनआरोग्य योजनेत आता होणार २३९९ उपचार

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या आता १,३५६वरून २,३९९पर्यंत वाढविण्यात येणार आहे. एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या...

राज्यपाल देवव्रत यांच्या शपथविधीलाही अजितदादांची दांडी!

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ...

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...
Skip to content