Homeडेली पल्सआगाऊ करासाठी प्राप्तीकर...

आगाऊ करासाठी प्राप्तीकर खात्याकडून ई-मोहिम

सुसंगत आगाऊ कर जमा न करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांना 15 मार्चपूर्वी कर जमा करण्यासाठी उद्द्युक्त करण्याकरीता प्राप्तीकर विभागाने ई-मोहिम हाती घेतली आहे.

आर्थिक वर्ष (F.Y.) 2023-24दरम्यान प्राप्तीकर विभागाला काही व्यक्ती/संस्था यांनी केलेल्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती प्राप्त झाली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत भरलेल्या करांच्या विश्लेषणाच्या आधारावर, विभागाला अशा व्यक्ती/संस्थांची ओळख पटली आहे ज्यांनी आर्थिक वर्ष 2023-24 (कर निर्धारण वर्ष  2024-25)साठी भरणा केलेले कर संबंधित कालावधीत केलेल्या आर्थिक व्यवहारांशी सुसंगत नाहीत. त्यामुळे, करदात्याच्या सेवा उपक्रमाचा एक भाग म्हणून प्राप्तीकर विभागाने एक ई-मोहिम हाती घेतली आहे. यामागचा उद्देश अशा व्यक्ती/संस्थांना ई मेलद्वारे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांची माहिती देता येणार आहे. कर निर्धारण वर्ष 2024-25साठी आगाऊ कर ई-मोहिम महत्त्वाचे व्यवहार म्हणून चिन्हांकित करून तसेच एसएमएस करून त्यांना त्यांच्या आगाऊ करदायित्वाची अचूक गणना करण्यास आणि 15 मार्च 2024 रोजी किंवा त्यापूर्वी देय आगाऊ कर जमा करण्यास उद्युक्त केले जाणार आहे.

कर

प्राप्तीकर विभागाला करदात्यांच्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांची माहिती विविध स्त्रोतांकडून प्राप्त होत असते. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि ऐच्छिक कर पूर्ततेला प्रोत्साहन देण्यासाठी ही माहिती वार्षिक माहिती निवेदनाद्वारे  (AIS) जाहीरव केली जाते आणि ती व्यक्ती/संस्था यांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येते. हे विश्लेषण करण्यासाठी AIS मधील ‘महत्त्वपूर्ण व्यवहार’ या स्वरुपात दर्शवण्यात येते.

महत्त्वपूर्ण व्यवहारांचे तपशील पाहण्यासाठी, व्यक्ती/संस्था त्यांच्या ई-फायलिंग खात्यावर लॉग इन करू शकतात (आधीच तयार असल्यास) आणि अनुपालन पोर्टलवर याची पूर्तता करू शकतात. या पोर्टलवर महत्त्वपूर्ण व्यवहार पाहण्यासाठी ई-कॅम्पेन टॅबद्वारे प्रवेश करता येऊ शकतो. ज्या व्यक्ती/संस्था ई-फायलिंग संकेतस्थळावर नोंदणीकृत नाहीत त्यांना प्रथम ई-फायलिंग संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करावी लागते. नोंदणीकरिता ई-फायलिंग संकेतस्थळावरील ‘नोंदणी’ बटण दाबत त्यामध्ये संबंधित तपशील प्रदान केला जाऊ शकतो. यशस्वी नोंदणीनंतर, ई-फायलिंग खात्यात लॉग इन केले जाऊ शकते आणि ई-मोहीम टॅबच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण व्यवहार पाहण्यासाठी पूर्तता पोर्टलवर प्रवेश केला जाऊ शकतो.

करदात्यांना पूर्तता सुलभ करण्यासाठी आणि करदात्यांच्या सेवा वाढवण्याची त्यांची वचनबद्धता बळकट करण्यासाठी प्राप्तीकर विभागाचा हा आणखी एक उपक्रम आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content