Thursday, October 24, 2024
Homeचिट चॅटराजू झनके यांना...

राजू झनके यांना डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समा

जभूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजू झनके यांना जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी १२ मार्चला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

विविध कारणास्तव मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेले महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार शासनाने काल रात्री उशिरा जाहीर केले. यात राजू झनके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजभूषण पुरस्कार २९२१-२०२२, हा जाहीर करण्यात आला. मागील २५ वर्षांपासून विविध दैनिकांमध्ये काम व २३ वर्षांपासून मंत्रालय आणि विधिमंडळाचे वार्तांकन करीत असलेले झनके यांनी आठ वर्षांपासून सुरू केलेली एक वही एक पेन अभियान, ही संकल्पना राज्यासह देशभरात लोकप्रिय झाली आहे.

या कार्यासोबतच मागील ३५ वर्षांपासून समाजातील विविध घटकांच्या प्रश्नावर आवाज उचलून त्यांना न्याय देण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर पाठपुरावा, रुग्णांना, महिलांना सहकार्य व मदत मिळवून देणे आदी कार्यातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content