Wednesday, October 23, 2024
Homeएनसर्कलसुवेनचे कोहान्सबरोबर लवकरच...

सुवेनचे कोहान्सबरोबर लवकरच विलिनीकरण

सुवेन फार्मास्युटिकल्स लिमिटेड (सुवेन) आणि कोहान्स लाइफसायन्सेस लिमिटेड (कोहान्स) यांनी विलिनीकरणासाठी प्रस्तावित एकत्रिकरणाची योजना नुकतीच जाहीर केली. सुवेनच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत करत आणि एकात्मिक सीडीएमओ क्षेत्रात नेतृत्त्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने प्रगती करत विस्तार आणि सातत्यपूर्ण उत्पन्न सुनिश्चित करण्याप्रती असलेली कंपनीची बांधिलकी यातून अधोरेखित होते.

कोहान्स, हे एक आघाडीचे सीडीएमओ आणि निवडक कमी-मध्यम व्हॉल्यूम मॉल्यूक्युल्समध्ये जागतिक पातळीवर अग्रणी तसेच त्याच्या अँटीबॉडी ड्रग कॉन्जुगेट्स (एडीसी) प्लॅटफॉर्मच्या रूपात अद्वितीय क्षमता असलेला मर्चंट एपीआय प्लॅटफॉर्म आहे. त्यांचा सीडीएमओ विभाग आर्थिक वर्ष २०-२३मध्ये 30%+च्या सक्षम सीएजीआरवर वाढला आहे आणि आर्थिक वर्ष २४च्या नऊमाहीसाठी त्याच्या एकूण नफ्यात 44% योगदान देत आहे.

  • विशिष्ट क्षमता आणि स्केल लाभांसह सुवेनचे सीडीएमओ उद्योग नेतृत्त्वाचे स्थान आणखी मजबूत करते- विलिनीकरणामुळे सुवेनचे स्थान भारतातील एक वैविध्यपूर्ण सीडीएमओ आणि एपीआय लीडर म्हणून प्रस्थापित होईल आणि आमच्या सध्याच्या महसुलाच्या आधाराच्या पुढे जाईल. विलीन झालेली संस्था भारतातील आघाडीच्या एकात्मिक सीडीएमओ कंपनीपैकी एक असेल अशी अपेक्षा आहे. 2,650 kLपर्यंत विस्तारित क्षमता आणि लक्षणीयरीत्या विस्तृत ग्राहक आधारासह, प्रमाण आणि एकात्मिक फायदे महत्त्वपूर्ण आहेत.
  • विकासाची अनेक इंजिने प्रदान करते- विलीन केलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये तीन भिन्न व्यवसाय युनिट्स-फार्मा सीडीएमओ, स्पेक केम सीडीएमओ आणि API+ (फॉर्म्युलेशनसह) आहेत. आमचे एकात्मिक सीडीएमओ मॉडेल औषधनिर्माण आणि विशेष रासायनिक भागीदारांसाठी सर्वसमावेशक रेणूकीय विकास आणि जीवनचक्र व्यवस्थापन सक्षम करते. कोहान्सची भर म्हणजे विशेषत: वेगाने वाढणारा त्यांचा एडीसी प्लॅटफॉर्म, आमच्या मूल्यवान ग्राहक आणि भागीदारांसाठी ऑफर वाढवणारे आघाडीचे सीडीएमओ प्लॅटफॉर्म म्हणून आमचे स्थान अधिक मजबूत करते.
  • जीएमपी सुविधांमध्ये अॅक्सेस पुरविणे- एकाधिक जीएमपी सुविधांमध्ये अॅक्सेसद्वारे (US FDA ऑडिट केलेले) हे विद्यमान ग्राहकांसाठी उत्पादन ऑफरची व्याप्ती वाढवते.
  • उत्पादन महसूल आणि खर्च समन्वय- कोहान्ससह आमच्या विलीनीकरणामुळे अपेक्षित एकत्रिकरण लाभ लक्षणीय आहेत. सुवेन आणि उलटपक्षी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोहान्सच्या क्षमतांचा फायदा घेत महसूल आघाडीवर, मर्यादित ग्राहक ओव्हरलॅप क्रॉस-सेलिंग संधीमध्ये मदत करेल. उदा. सुवेन ग्राहकांसाठी एडीसी प्लॅटफॉर्म आणि मुख्य रेणूंचे जीवनचक्र व्यवस्थापन यांचा लाभ होईल.
  • खर्चाच्या बाजूबाबत, फायद्यांमध्ये सर्वसाधारण विक्रेत्यांद्वारे पुरवले गेलेले साहित्य, संपूर्ण प्लॅटफॉर्मवर खर्च ऑप्टिमायझेशन, संपूर्ण प्लॅटफॉर्मवर (वि स्टँडअलोन) संसाधने म्हणून लाभ घेत असताना G&Aमध्ये संभाव्यतः कमी गुंतवणूक आणि प्लॅटफॉर्मवर सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे समाविष्ट आहे.
  • सर्वोत्कृष्ट आर्थिक मेट्रिक्सद्वारे भागधारकांसाठी महत्त्वपूर्ण मूल्य तयार करते- विलीन केलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये सर्वोत्तम आर्थिक मेट्रिक्स आहेत. मिड 30 EBITDA मार्जिन, 30%+ RoCE, आर्थिक वर्ष २०-२३ मध्ये मजबूत रोख प्रवाह निर्मिती.
  • API+ व्यवसायाची जोडणी प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेतील आघाडीच्या शेअरसह निवडक कमी-मध्यम प्रमाणातील उच्च मूल्याचे रेणूची भर घालेल. सखोल मूल्य स्थान आणि मजबूत रासायनिक क्षमतांद्वारे समर्थित आहे. हे आमच्या फॉर्म्युलेशन व्यवसायाचे प्रमाण वाढविण्यातदेखील मदत करेल, बॅकवर्ड इंटिग्रेशन द्वारे समर्थित आहे. ते उपलब्ध क्षमतेच्या इष्टतम वापरात मदत करेल.
  • प्रस्तावित विलिनीकरणाबाबत भाष्य करताना सुवेनचे कार्यकारी अध्यक्ष अण्णास्वामी वैधीश म्हणाले की, सुवेनच्या विकासाच्या प्रवासातील आणि एक सन्माननीय एकात्मिक सीडीएमओ कंपनी तयार करण्याच्या प्रवासातील हे एक परिवर्तनकारी पाऊल आहे. आम्ही एकत्रित प्रमाण, क्षमता, पूरक ग्राहक आधार यांच्या फायद्यांबद्दल आणि भारत आणि जागतिक स्तरावर आमचे नेतृत्त्वस्थान वाढवण्यास मदत करतील अशा सर्वोत्कृष्ट पद्धतीबाबत अत्यंत उत्सुक आहोत.
  • प्रस्तावित विलिनीकरणावर बोलताना सुवेनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. व्ही प्रसाद राजू म्हणाले की, सुवेन आणि कोहान्समध्ये पसरलेली आमची संपूर्ण व्यवस्थापन टीम फार्मास्युटिकल आणि स्पेशालिटी केमिकल लँडस्केपच्या भविष्याला आकार देण्यासाठी उत्साही आहे. महसूल आणि खर्च अशा दोन्ही आघाडीवर हा सहयोग आम्हाला बहुविध समन्वय साधण्यास मदत करत आहे.

प्रस्तावित विलिनीकरणाविषयी माहिती देताना सुवेनच्या बोर्ड सदस्य आणि ॲडव्हेंट इंटरनॅशनल- इंडियाच्या व्यवस्थापकीय भागीदार आणि प्रमुख श्वेता जालान म्हणाल्या की, हे विलिनीकरण म्हणजे भारतात एक आघाडीची सीडीएमओ कंपनी उभारण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे. जागतिक पातळीवर अशाच प्रकारचे काम करणाऱ्याकडून समान एंड-टू-एंड क्षमतांसह प्रेरणा घेऊन, आम्हाला जागतिक स्तरावर विस्तार करण्याच्या आमच्या क्षमतेवर विश्वास आहे.

धोरणात्मक लाभ आणि कृती

प्रस्तावित विलिनीकरणावर भाष्य करताना सुवेनचे बोर्ड सदस्य आणि ॲडव्हेंट इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज पटवारी म्हणाले की, आम्ही नुकत्याच एकात्मिक सीडीएमओ प्रवासाला सुरुवात केली आहे आणि या क्षेत्रात एक जागतिक पातळीवर अग्रणी बनण्यासाठी खूप उत्सुक आहोत. या सहयोगामुळे आम्हाला आमच्या तीन इंजिनांपैकी प्रत्येकासाठी एक ठोस आधार मिळाला आहे आणि सीडीएमओ क्षेत्र एकत्रित करत आम्ही त्या प्रत्येकाच्या मागे ऑर्गनिक आणि इन ऑर्गनिक अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करू.

व्यवहाराचा तपशील

  • स्वॅप प्रमाण आणि शेअरहोल्डिंग: योजना प्रभावी झाल्यानंतर, स्वॅप गुणोत्तरावर आधारित कोहान्सच्या सर्व भागधारकांना कोहान्सच्या प्रत्येक 295 शेअर्समागे सुवेनच्या 11 शेअर्सच्या प्रमाणात सुवेनचे शेअर्स जारी केले जातील. या प्रकारे मिळालेल्या सुवेनच्या नवीन शेअर्सचे एनएसई आणि बीएसईवर व्यवहार होतील. ॲडव्हेंट संस्थांकडे 66.7% आणि सार्वजनिक भागधारक एकत्रित घटकाच्या 33.3% धारण करतील (प्री-ESOP डायल्यूशन)
  • टाइमलाइन: सर्व संबंधित शेअरहोल्डर आणि नियामक मंजुरी मिळाल्यानंतर पुढील 12-15 महिन्यांत एकूण व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content