Saturday, April 19, 2025
Homeकल्चर +यप्प टीव्हीने झी...

यप्प टीव्हीने झी चॅनल्स केले लाँच!

यप्प टीव्ही, या साऊथ एशियन कंटेंटसाठी जगात सर्वात आघाडीच्या प्लॅटफॉर्मने अमेरिका आणि कॅनडा येथे झी नेटवर्क चॅनल्स लाँच केले आहेत.

या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना झी चॅनल्सचे रिलेटेबल फिक्शन, हाय व्होल्टेज नॉन-फिक्शन, भव्य कार्यक्रम तसेच हिंदी आणि प्रादेशिक भाषांतील ब्लॉकबस्टर चित्रपट असा विस्तृत संमिश्र कंटेंट मिळेल. झी चॅनल्सच्या लाँचिंगद्वारे, यप्प टीव्हीने भारतीय मनोरंजन क्षेत्रात बहुतांश सर्व भाषा आणि शैलींना स्पर्श केला आहे.

यप्प टीव्हीचे संस्थापक आणि सीईओ उदय रेड्‌डी म्हणाले की, झी एंटरटेनमेंट, या आघाडीच्या मनोरंजन नेटवर्कसोबत पुन्हा एकदा भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे अमेरिका आणि कॅनडातील बाजारात मनोरंजनाचे चॅनल्स पुन्हा पोहोचवता येतील. झी, हा आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषत: अमेरिका, जिथे भारतीय संस्कृतीशी तो समांतर आहे, अशा ठिकाणी नि:संशयपणे सर्वात पॉवरफुल भारतीय ब्रँड आहे.

अमेरिकन मार्केट डिजिटायझेशनबाबत सर्वात आघाडीवर असते. केवळ वापराबाबतच नव्हे तर अॅड सेल्समध्येही ते पुढे आहे. आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, झी जाहिरातदारांना इन्क्रिमेंटल एचएचएस तसेच डिलिव्हरी (इम्प्रेशन्स)वर आधारीत धोरणात्मक डील्सची सुविधा प्रदान करू शकतो. राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर ही सुविधा उपलब्ध असून इतर कोणतेही प्लॅटफॉर्म अशा प्रकारचा लाभ प्रोग्रामर्सना प्रदान करत नाहीत. यप्पवरील प्रत्येक जाहिरात अखेरच्या डॉटपर्यंत मोजता येऊ शकते. अमेरिकेतील साऊथ एशियन अॅडव्हरटाइजर्ससाठी हे गेमचेंजर ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

यप्प टीव्हीचे यूझर्स या प्लॅटफॉर्मवरून झी चॅनल्सच्या सुविधा मिळवू शकतात. मग यात ‘कुमकुम भाग्य’सारखे मोहक कौटुंबिक नाट्य, ‘भाभी जी घर पर है’सारखे कौटुंबिक विनोदी किंवा ‘इंडियन प्रो म्युझिक लीग’सारखे रिअॅलिटी शो या सर्वांचा समावेश होतो. यूझर्सना झी टीव्ही, अँड टीव्ही आणि झी सिनेमा (लेटेस्ट मूव्हीज) यासारखे चॅनेल्स पाहता येतील. तसेच झी तेलगू, झी तमिळ, झी कन्नडा, झी केरलम, झी पंजाबी, झी मराठी आणि झी बांगला यासारखे विविध प्रादेशिक चॅनलही पाहता येतील. अमेरिका आणि कॅनडा मार्केटमध्ये या नेटवर्कच्या रिलाँचसह, यप्प टीव्हीचे यूझर्स विविध भाषा आणि शैलीतील कार्यक्रमांचा मनमुरादपणे आस्वाद घेऊ शकतील.

Continue reading

तब्बल 40 वर्षांनी भारताचे दुसरे अंतराळवीर झेपावणार अवकाशात

अंतराळ क्षेत्रात वाटचालीत एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज झाला असून, पुढच्या महिन्यात भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम आयोजित होणार आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांषू शुक्ला, ऍक्झियॉम स्पेसच्या एएक्स-4 मोहिमेचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ...

पोराचा बाजार उठला रं…

जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शीर्षकगीत रिलीझ करण्यात आलं. त्यापाठोपाठ आता याच चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं..' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सूरज चव्हाण, जुई...

‘एप्रिल मे 99’ने होणार मराठी चित्रपट महोत्सवाला सुरूवात

मुंबईच्या प्रभादेवीतल्या महाराष्ट्र कला अकादमीमधील पु. ल. देशपांडे सभागृहात येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४१ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६...
Skip to content