मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने मरहूम उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मरणार्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या रविवारी, २५ फेब्रुवारी २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी त्यांना तबल्यावर तेजोवृष जोशी तर संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे साथ देतील. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क– ०२२-२४३०४१५०