Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातल्या मुलींना पदव्युत्तरपर्यंत...

महाराष्ट्रातल्या मुलींना पदव्युत्तरपर्यंत मोफत शिक्षण?

महाराष्ट्रातल्या सर्व मुलींना पदव्यत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून कधीही याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत नुकतेच शासनाचे धोरण जाहीर केले आहे. त्यात याचा समावेश आहे.

शिक्षण

या प्रस्तावित निर्णयाची माहिती मिळताच राज्यसभेच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने विधान भवनात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणामध्ये मोलाची भर पडणार आहे, असे त्या म्हणाल्या.

आज विधानभवनात यानिमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. या ऐतिहासिक निर्णयासाठी त्यांचे तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभारही त्यांनी मानले. यावेळी राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, मेधा कुलकर्णी, डॉ. गोपछडे यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मंत्री शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रताप चिखलीकर,आमदार भरत गोगावले, प्रसाद लाड, विप्लव बजोरिया, माजी आमदार अमर राजुरकर, राम रातोळीकर, संजय शिरसाट, बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह आदी हजर होते.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content