लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला जेमतेम महिना राहिला असतानाच रिपब्लिकन पार्टीचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चित्रसृष्टीशी संबंधित असलेल्या दिग्गजांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा चालविला आहे. कालच त्यांनी अभिनेता तथा माजी खासदार गोविंदा यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेत ‘चाय पे चर्चा’ केली.
त्यापाठोपाठ कालच त्यांनी प्रसिद्ध संगीतकार आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल, या संगीतकार जोडीतले प्यारेलाल तथा पद्मभूषण प्यारेलाल शर्मा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांचा हा सिलसिला नेमके काय अधोरेखित करतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.