Homeटॉप स्टोरीमाजी मंत्री रोहिदास...

माजी मंत्री रोहिदास पाटील व्हेंटिलेटरवर!

महाराष्ट्राचे माजी मंत्री, खान्देश नेते रोहिदास तथा दाजी पाटील आपल्या मुलीकडे कोल्हापूर येथे गेले असतानाच गेल्या आठवड्यात प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे फुफ्फूस कमी क्षमतेने काम करत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील साई कार्डीयाक सेंटर येथील आयसीयूत डॉ. चंद्रशेखर पाटील आणि कोल्हापूर येथील फुफ्फूस तज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत. पहिल्या आठवड्यात त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. मात्र कालपासून प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचे सुपूत्र विनय पाटील, आमदार कुणाल पाटील सोमवारपासून कोल्हापूरलाच आहेत. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी रुग्णालयात न येता आपल्या घरीच रोहिदास पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

Continue reading

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...
Skip to content