मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारेटपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 54वी पेंशन अदालत दिनांक 19-03-2024 रोजी दुपारी तीन वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई- 400 001 येथे आयोजित केली आहे.
निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांची सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक, ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालतमध्ये विचार केला जाईल.
पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे, ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्जाचे तीन प्रती, लेखा अधिकारी, अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई – 400 001ला 19-02-2024 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक स्वरुपात (तक्रारी मोठया प्रमाणात / इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकता. 19-02-2024च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.
भारतीय डाक विभाग
डाक पेंशन अदालतसाठी पाठवायच्या अर्जाचा नमुना
क्र. | विषय | वैयक्तिक / निवृत्तिवेतनधारक अन्वये भरण्यात येणारे तपशील |
1 | निवृत्ती / मृत्युच्यावेळी पदनामासह निवृत्तिधारकाचे / कुटुंब निवृत्तिधारकाचे नाव | |
2 | कार्यालयाचे नाव जिथून निवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीची तारीख | |
3 | पीपीओ क्रमांक | |
4 | पोस्टऑफिस आणि डिवीजनचे नाव जिथून पेंशन घेतली जात आहे. | |
5 | निवृत्तिवेतनधारकाचा पत्ता | |
दूरध्वनीसह . | ||
6 | थोडक्यात तक्रार | |
(जर आवश्यकता असेल तर तपशीलासह अर्ज जोडा.) | ||
7 | व्यक्ती / निवृत्तिवेतनधारकांची सही आणि दिनांक व मो.न. |