Friday, September 20, 2024
Homeहेल्थ इज वेल्थलसीकरणासाठीही सरसावला सोनू...

लसीकरणासाठीही सरसावला सोनू सूद!

कोविडच्या लॉकडाऊन काळात आपापल्या गावी जाणाऱ्या स्थलांतरीतांना मदत करण्यासाठी धडपडणारा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद आता ग्रामीण भागातल्या जास्तीतजास्त लोकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्याकरीता प्रवृत्त करण्यासाठीही पुढे सरसावला आहे. स्थानिक स्तरावरील स्वयंसेवकाच्या माध्यमातून हे काम करण्यासाठी सोनू सूदने नुकतेच COVREG या स्वयंसेवक नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ केला.

ग्रामीण भारतात कोविड लसीकरण नोंदणीसाठी जगातील सर्वांत मोठा स्वयंसेवक कार्यक्रम राबवण्याचे उद्दिष्ट या उपक्रमापुढे आहे. ग्रामीण भागातील आघाडीची फिनटेक कंपनी स्पाइस मनी या उपक्रमाला सहाय्य करत आहे. www.covreg.in या उपक्रमाच्या वेबसाइटमार्फत स्वयंसेवक घेतले जाणार आहेत.

स्वयंसेवकांनी उपक्रमासाठी या वेबसाइटमार्फत नोंदणी केली की, त्यांना एक अॅप पुरवले जाईल आणि या अॅपद्वारे ते भारतातील सुमारे ९५ कोटींच्या ग्रामीण लोकसंख्येला कोविड लसीकरण नोंदणीसाठी मदत करू शकतील. भारताच्या एकूण लोकसंख्येत ग्रामीण लोकसंख्येचा वाटा ६५ टक्के आहे.

हे अॅप तयार करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञानात्मक सहाय्य स्पाइस मनी पुरवेल. सध्या स्पाइस मनी आपले अधिकारी अॅप आणि वेब पोर्टल यांच्या माध्यमातून कोविन प्लॅटफॉर्मला रिडायरेक्शन पुरवते. हे अॅप ग्रामीण भारतात कार्यरत असलेले २ लाखांहून अधिक अधिकारी उपयोगात आणत आहेत आणि त्यांच्या ग्राहकांना कोविड लसीकरणासाठी नोंदणी करण्यात मदत करत आहेत.

COVREG या उपक्रमाला केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने संरक्षित कोविन एपीआयसह अॅप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर (एएसपी) म्हणून मान्यता दिली आहे. ग्रामीण भारतातील कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी असिस्टेड मॉडेल राबवण्यास मुभा देणारे हे पहिले एएसपी-एनेबल्ड बीटूबी अॅप असेल. 

भारतातील ग्रामीण लोकसंख्येला डिजिटल साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यामुळे कोविड लसीकरण नोंदणीत अडचणी येत आहेत आणि त्यामुळे लसीकरणासाठी त्यांना देऊ केल्या जाणाऱ्या डिजिटल स्वयंनोंदणी सेवेचा पूर्ण लाभ घेण्यास हे लोक असमर्थ आहेत. ग्रामीण भागातील डिजिटल साक्षरता, संरचना आणि उपलब्धतेचा अभाव या समस्या COVREG हाताळणार आहे.

सोनू सूद

COVREGचे स्वयंसेवक लोकांना लशीच्या लाभांबद्दल शिक्षित करून व त्यांच्यात सामान्यपणे आढळणारे गैरसमज दूर करून लसीकरणाबाबत असलेली साशंकता काढून टाकण्यासाठीही काम करणार आहे. स्वयंसेवक ग्रामीण नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी करतील व दोन्ही डोसेससाठी त्यांना स्लॉट्स बूक करून देतील. हे लोक लसीकरण केंद्रांवर पोहोचले की नाही याचा पाठपुरावा करतील आणि त्यांना लसीकरणानंतर प्रमाणपत्र प्राप्त करण्यातही मदत करतील.

नागरिकाजवळ ओळखपत्र नसण्यासारखे मुद्दे हाताळण्याचे प्रशिक्षण COVREG स्वयंसेवकांना दिले जाईल. त्यामुळे ते लाभार्थींना पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासारख्या कामात मदत करू शकतील. स्मार्टफोन व 4 जी कनेक्टिव्हिटी जवळ असलेली कोणीही व्यक्ती www.covreg.in या वेबसाइटवर नोंदणी करून स्वयंसेवक होऊ शकते.

स्पाइस मनीचे ५ लाखांहून अधिक अधिकाऱ्यांचे (बँकिंग संपर्क एजंट्स) व सहयोगींचे विस्तृत जाळे भारतातील ९५ टक्के ग्रामीण पिनकोड्सच्या भागांत पसरलेले आहे. या नेटवर्कचा लाभ घेऊन COVREG स्वयंसेवक ग्रामीण भागांतील पोहोच कमाल मर्यादेपर्यंत वाढवतील. याशिवाय सध्या सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनसोबत काम करणारे स्वयंसेवकही COVREG स्वयंसेवक नेटवर्कचा भाग असतील. खास या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे उद्दिष्ट फाउंडेशनपुढे आहे.

स्वयंसेवकांच्या कार्यस्थळावरील व्यवस्थापनाची जबाबदारी एक सोच फाउंडेशन, या सहयोगी संस्थेवर असेल. विशाल मनुष्यबळाच्या एकत्रिकरणामुळे योग्य माहिती, शिक्षण याचा अधिकाधिक प्रसार करता येईल आणि भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचून लसीकरणाबद्दलची भीती दूर करता येईल. 

कोविड-१९ विरोधातील लढाई जिंकण्यासाठी लसीकरण ही भारतात काळाची गरज आहे. ग्रामीण भारत आजही साथीशी झगडत आहे आणि आता लसीकरण नोंदणीसाठीही ग्रामीण भारताला संघर्ष करावा लागत आहे. म्हणूनच ग्रामीण भागाबद्दलच्या सखोल ज्ञानाच्या व अनेक महिने या भागांत प्रत्यक्ष काम केल्यामुळे लक्षात आलेल्या गरजांच्या आधारावर COVREGची निर्मिती करण्यात आली आहे, असे सोनू सूद याने या उपक्रमाबद्दल सांगतले.

स्पाइस मनीचे संस्थापक दिलीप मोदी म्हणाले की,कोविड-१९ आजाराचा प्रसार रोखण्यासाठी व ग्रामीण भागातील उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामीण लोकसंख्येचे लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. ग्रामीण नागरिकांना लसीकरण नोंदणीमध्ये जाणवणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आम्ही COVREG चे असिस्टेड मॉडेल तयार केले आहे. सोनू सूद यांच्या सेवाभावी कार्याच्या प्रवासाबद्दल आमच्या मनात नेहमीच आदर राहिला आहे आणि COVREGसोबत सहयोग करणे हे आमच्या ग्रामीण उन्नतीच्या समान उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

Continue reading

राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरची बाजी

नांदेड येथे नुकत्याच झालेल्या २१व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण १९ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत विविध राज्यांतून ३००पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे...

गणेशोत्सव जपानमधला…

यंदाचे म्हणजे २०२४ हे वर्ष जपानमधील योकोहामा मंडळाचे ९वे वर्ष. जपानमधील योकोहामा मंडळ वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असतात. यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव. यावेळी मे महिन्यापासूनच गणेशागमनाचे वेध लागले होते. दरवर्षी योकोहामा गणेशोत्सव शनिवार-रविवार २ दिवस साजरा केला...

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...
error: Content is protected !!
Skip to content