Sunday, September 8, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजराज्यातल्या १९१ वेठबिगार...

राज्यातल्या १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना, कॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्तेतेसोबतच त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात येत आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यातील एकूण १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली असून त्यातील १०४ वेठबिगार हे कातकरी समाजातील होते.

शासन अधिसूचना दि.१७/०६/२००२ व दि.०५/०८/२००८ अन्वये वेठबिगार अधिनियम १९७६च्या अंमलबजावणीकरिता राज्यामध्ये ३२ जिल्हा  दक्षता समित्या स्थापन केल्या असून उप विभागीय स्तरावर एकूण १२४ उप विभागीय दक्षता समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या दक्षता समित्यांचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असून उप विभागीय दक्षता समित्यांचे विभागीय अधिकारी अध्यक्ष आहेत. सदर दक्षता समित्यांची व उप विभागीय समित्यांची वेळोवेळी बैठका होत आहेत. कातकरी निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी या समित्यांच्या माध्यमातून करण्यात येते.

राज्यात मागील दोन वर्षात १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्हयामध्ये जानेवारी, २०२१ ते डिसेंबर, २०२३ या कालावधीत कातकरी समाजातील एकूण ६७ बेठबिगार आढळून आलेले आहेत. पालघर जिल्हयाचे रहिवासी असलेले एकूण २३ वेठबिगार कामगार हे सन २०१९ मध्ये १३ व सन २०२० मध्ये ५ असे एकूण १८ वेठबिगार ठाणे जिल्ह्यात आढळुन आलेले आहेत. तसेच सन २०२२ मध्ये ५ कामगार अहमदनगर जिल्ह्यात काम करताना आढळून आलेले असून त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये कातकरी समाजातील एकूण ३७ वेठबिगार कामगार (नाशिक जिल्हयातील १ व अहमदनगर जिल्हयातील ३६) आढळुन आलेले आहेत तर  रायगड जिल्ह्यामध्ये जानेवारी, २०२१ ते डिसेंबर, २०२३ या कालावधित कातकरी समाजातील एकही बेठबिगार आढळून आलेला नसल्याची माहिती कामगार विभागाने दिली आहे.

कामगार विभागाच्या पाठपुराव्याने  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या  दिनांक २३.१२.२०१६ शासन निर्णयानुसार एकूण ५ कामगारांना प्रत्येकी रु. २५,०००/- प्रमाणे रुपये १,२५,०००/- इतकी आर्थिक मदत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यात आढळलेल्या कातकरी समाजातील एकूण ३७ वेठबिगार कामगारपैकी (नाशिक जिल्हयातील १ व अहमदनगर जिल्हयातील ३६) २५ वेठबिगारांना प्रत्येकी रु. ३०,०००/- प्रमाणे एकूण रक्कम रु.७,५०,०००/- एवढी तातडीची आर्थिक मदत करण्यात आलेली तसेच पीएफएमएस प्रणाली मार्फत नाशिक जिल्हयातील १ कामगारास पहिला हप्ता रु. २५,०००/- व दुसरा हप्ता रुपये ५०,०००/- देण्यात आलेला आहे.

भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयने वेठबिगार कामगारांच्या पुनर्वसनाकरिता Central Sector Scheme for Rehabilitation of Bonded Labour-2016  या योजनेत सुधारणा करुन वेठबिगार पुनर्वसन योजना, २०२१ ही सुधारित योजना सन २०२१  ते सन २०२५ २०२६ या कालावधीकरिता जानेवारी २०२२पासून लागू केलेली आहे. सदर याजनेमध्ये प्रौढ पुरूष लाभार्थीस रु. १,००,०००/-, विशेष प्रवर्गातील लाभार्थीस रु. २,००,०००/-, तीव्र स्वरुपाच्या वेठबिगारीशी संबंधित दुर्लक्षित प्रकरणांमध्ये प्रत्येकी रु. ३,००,०००/- इतके पुनर्वसनाकरिता आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच सदर योजनेमध्ये वेठबिगार कामगारांच्या पुनर्वसनाकरिता जिल्हा स्तरावर निधी उभारुन त्यामध्ये कमीत कमी रु. १०,००,०००/- इतका कॉपर फंड ठेवण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, ठाणे व  पालघर यांच्यामार्फत शासनास वेळोवेळी कॉर्पस फंडाची मागणी करण्यात आली आहे.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content