Homeन्यूज अँड व्ह्यूजस्टील प्रकल्पासाठी सह्या...

स्टील प्रकल्पासाठी सह्या दावोसमध्ये, चर्चा मात्र मुंबईत!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, सुरजागड इस्पात प्रा. लि.ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विदर्भ विशेषत: गडचिरोलीसाठी ही मोठी उपलब्धी आहे. सुनील जोशी हे दावोस परिषदेत सहभागी होणार असून, तेथे ते राज्य सरकारसोबत सामंजस्य करारसुद्धा करणार आहेत. दावोसला सामंजस्य करार करण्याआधी त्यांनी या प्रकल्पावर फडणवीस यांच्याशी ही प्राथमिक चर्चा केली.

सुरजागड इस्पात प्रा. लि.चे अध्यक्ष सुनील जोशी यांनी काल सकाळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 8 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पात जागतिक दर्जाचे उत्पादनविषयक तंत्रज्ञान राहणार असून, पर्यावरण रक्षण हा त्याचा मुख्य गाभा असेल. त्यामुळे हा संपूर्णत: पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प राहणार आहे, अशीही माहिती यावेळी सुनील जोशी यांनी दिली.

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून, या भागात रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न होत आहेत. गडचिरोली हे देशाचे पोलाद हब होण्याची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, अशी हमी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

गडचिरोलीत विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. कोनसरी येथे एका प्रकल्पाचे उदघाटन आणि दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनसुद्धा लवकरच होणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना या कोनसरी प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. आता या नव्या गुंतवणुकीतून गडचिरोली आणि पर्यायाने विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

Continue reading

‘कोटक सिक्युरिटीज’ने सुचविले काही धमाकेदार दिवाळी शेअर्स!

"कोटक सिक्युरिटीज"ने वर्षभरात 34%पर्यंत रिटर्न्स देतील असे खात्रीशीर धमाकेदार शेअर्स या दिवाळीत गुंतवणुकीसाठी सुचविलेले आहेत. पुढील दिवाळीपर्यंत चांगली कामगिरी करू शकतील असे 7 स्टॉक या ब्रोकरेज हाऊसने शॉर्टलिस्ट केले आहेत. अदानी पोर्ट्स-सध्याची किंमत (CMP): ₹ 1,419पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट: ₹ 1,900गुंतवणुकीवर...

मुलुंडमध्ये उद्या ‘दिवाळी पहाट’!

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने यंदा राज्यभर दहा ठिकाणी व दिल्लीतही ‘दिवाळी पहाट’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क, दादर येथे आज, २१ ऑक्टोबरला हा कार्यक्रम झाला. उद्या मुंबईच्या कालिदास नाट्यगृह (मुलुंड) येथे दिवाळी पहाट,...

नितंब, मनगट, कण्यातले फ्रॅक्चर हे ठिसूळ हाडांचे लक्षण

जगभरात जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन साजरा होत असताना, आयुष मंत्रालयाने लाखो लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या ऑस्टिओपोरोसिसच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सुरुवातीपासूनच घ्यायची प्रतिबंधात्मक काळजी आणि जीवनशैलीच्या गंभीर गरजेवर भर दिला आहे. हाडांच्या आरोग्याबद्दल आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजाराला तोंड देण्यासाठी आयुर्वेद कसे उपयोगी ठरू शकते हे...
Skip to content