केंद्र सरकार 2024 या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याचे अंदाज काही प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमधून वर्तवले जात आहेत. मात्र, या बातम्या खोट्या आहेत, असे केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात एचपीव्ही लसीकरण सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. देशातील सर्वायकल (गर्भाशयमुखाच्या) कर्करोगाच्या प्रकरणांवर मंत्रालयाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे आणि या संदर्भात राज्ये आणि विविध आरोग्य विभागांसोबत मंत्रालय नियमितपणे संपर्कात आहे.