Homeमाय व्हॉईसरत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठल्या...

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठल्या गायत्री मंत्राचे पठण?

रत्नागिरी जिल्ह्याच्या कारभाराबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर तक्रारी माझ्याकडे येत होत्या. काहींनी तर, चेक नाक्यावर वा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सीसीटीव्हीचे क्लिप तपासले तर काही विशिष्ट गाड्या ठराविक वेळेला बंदी असूनही कशा ये-जा करत होत्या ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजून येईल, असा दावा केला आहे. रात्री नऊ वाजल्यानंतर जिल्हाधिकारी कुठल्या गायत्री मंत्रांचे पठण करतात आणि कसली आचमने घेतात हे कळले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना क्षणभरही तेथे ठेवणार नाहीत, याची खात्री वाटते.

मुख्यमंत्र्यांचे उजवे हात समजले जाणारे मंत्रीमहोदयही या जिल्हाधिकाऱ्यांपुढे हतबल असल्याचे समजते. काहींनी तर हेच मंत्रीमहोदय त्यांना पाठीशी घालत असल्याची कुजबुज आहे. या मंत्री महाशयाचें जवळचे नातेवाईक नेहमीच सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याची कुजबुज संपूर्ण जिल्ह्यात आहे. म्हणूनच सोबत जोडलेली तक्रार येथे देत आहे-

जिल्ह्याधिकाऱ्यांना नोटीस आणि नोटिशीत त्यांच्या भेसूर कारभाराबाबतचा पंचनामा!

येथील वकिल एड. सूरज मोरे यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे आपत्ती निवारण समितीप्रमुख लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी कोरोनाच्या आपत्ती काळात गेल्या वर्षभर जो धिंगाणा या जिल्ह्यात घातला होता त्याला जबाबदार ठरवून जनतेचे जे हाल झाले याबाबत खरपूस समाचार घेणारी नोटीस पाठवल्याने जनतेत आनंदाचे चित्र आहे.

कोरोना काळात अनेकांच्या जवळचे नातेवाईक गेले. अनेकांना आपले रोजगार आणि नोकऱ्या गमवाव्या लागल्या. खाण्यापिण्याचे हाल झाले. वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे लोकं सैरभैर झाली. अशा या आपत्ती काळात शासकीय यंत्रणांना घटनेने दिलेल्या विशेष अधिकारात शासनातले लोक माणसासारखं वागण्याऐवजी सैतानासारखं वागत असल्याचे अनुभव जनतेने घेतले. तरीही शांतपणे आणि संयमी लोकांवर शासकीय यंत्रणांनी आपली मुजोरी दाखवली. या सर्व संतापला एड. सूरज मोरे यांनी वाचा फोडली म्हणून त्यांना धन्यवाद!

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा कोरोनाग्रस्त होण्यास ना. उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्याकडे मोठया प्रमाणावर दोष जात असून, आपत्ती काळात हे दोघे जण आणि सोबत आमदार राजन साळवी असे तिघे शासकीय रुग्णालयातील सिव्हिल सर्जनला नामोहरम करणारे राजकारण खेळत होते. त्यांना लोकांच्या जीवाची अजिबात पर्वा नव्हती. भूतपूर्व सिव्हिल सर्जन डॉ. अशोक बोल्डे यांच्या कारभारात नको तितका हस्तक्षेप करत ही मंडळी शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणावर होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत दोषी असलेल्या लोकांना पाठीशी घालायचे राजकारण करत होते.

जिल्हाधिकारी केबिनमध्ये वरील तिघांकडून तत्कालीन सिव्हिल सर्जन डॉ. अशोक बोल्डे यांना दमबाजीही करण्यात आली होती. एका प्रामाणिक आणि हुशार सिव्हिल सर्जनच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या, त्यांना वारंवार अपमानित करणाऱ्या या तिघांनी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात अशाप्रकारे धुमाकूळ घालून जो खेळखंडोबा केला आणि जिल्ह्याच्या आरोग्यसेवेचे जे तीनतेरा वाजवले अशा या तिघांना जबाबदार अधिकारी आणि नेते कसं म्हणू शकता?

हे तर अत्यंत बेजबाबदार आणि विक्षिप्त लोक असून, रत्नागिरीतील जनता यांच्या विचित्र कारभाराखाली अजिबात सुरक्षित नाही. आपत्ती काळात लोकांशी कसं वागायचं याचं भानही नसलेले हे बेभान लोक आहेत. आपत्ती निवारण समितीचा प्रमुख जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा हे रात्री 9नंतर कोणाचा फोनही उचलत नाहीत, अशा त्यांच्याबदल तक्रारी असून सूरज मोरे यांनी पाठवलेल्या खलित्याबाबत त्यांचे सर्वत्र स्वागतच होईल!

रत्नागिरीतील एवढ्या मोठ्या वकील वर्गापैकी एकट्या सूरज मोरे यांनी बेभान यंत्रणेविरोधात आवाज उठवला म्हणून ते विशेष अभिनंदनास पात्र आहेत, असे शेखरकुमार भुते, संपादक: अनियतकालीक रंगयात्री, यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप केला तरच या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

‘त्या’ बेवारस बोटीबाबत जाबजबान्या झाल्या तरी कुणाच्या?

आजकाल राज्यात वा केंद्रात जरा काही खुट्ट वाजले की उच्चस्तरीय चौकशी वा विशेष दक्षता पथकाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जाते. याच धर्तीवर सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी सापडलेल्या बेवारस बोट व त्यातील...

देवाभाऊ गरिबांची कशाला चेष्टा करता?

आता डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत सत्ता व विरोधी पक्षांतील राजकीय नेते राज्यातील जनतेच्या तोंडावर कुठलेही आश्वासन फेकतील. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व महापालिकांमधील निवडणुका होणार आहेत. अन्य कुठल्याही राजकीय नेत्यांनी आश्वासन दिल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येते. परंतु मुख्यमंत्रीपदावरील हुशार व्यक्तीने (देवाभाऊ)...

आचार्य अत्रे यांनी जखम होऊ न देता केलेली गुळगुळीत दाढी!

आचार्य उपाख्य प्रल्हाद केशव अत्रे हे मराठी सारस्वताला मिळालेले मोठे देणे आहे. साहित्यिक, पत्रकार, राजकारणी नेता, शिक्षणतज्ज्ञ, अशा बहुविध भूमिका ते लीलया जगले, हे सारा महाराष्ट्र जाणतो. अशा या महान साहित्यकाराच्या लेखणीतून जन्मलेल्या 'झेंडूची फुले' या विडंबनात्मक काव्याला 100...
Skip to content