Homeडेली पल्सउद्यापासून संसदेच्या हिवाळी...

उद्यापासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला होणार सुरूवात!

उद्या, 4 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून  या अधिवेशनचा समारोप 22 डिसेंबरला शुक्रवारी होईल. त्यात 19 दिवसांत कामकाजाच्या 15 बैठका होतील. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकार आणि सर्व राजकीय पक्षाच्या सभागृह नेत्यांची बैठक झाली.

या अधिवेशनात भारतीय नाट्य संहिता, मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती, कार्यकाल), केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (दुसरी सुधारणा) या तीन विधेयकांसह एकूण 21 विधेयके आणली जाणार असून त्यातील दोन वित्त विधेयक आहेत, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीनंतर सांगितले.

संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीच्या नियमांतर्गत परवानगी दिलेल्या कोणत्याही मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्यास सरकार नेहमीच तयार असते. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी सहकार्य करावे आणि पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मांडलेले मुद्दे ऐकून घेतल्यानंतर बैठकीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी उपस्थित नेत्यांचे आभार मानले आणि या सर्व मुद्द्यांवर संसदेच्या संबंधित सभागृहांच्या नियमांनुसार आणि संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीने चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे सांगितले. या बैठकीला तेवीस राजकीय पक्षांचे एकूण तीस नेते उपस्थित होते.

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content