Wednesday, January 15, 2025
Homeहेल्थ इज वेल्थआता मुंबईत १८...

आता मुंबईत १८ ते ५९ वर्षांच्या लाभार्थ्‍यांनाही मिळणार ‘इन्‍कोव्‍हॅक’चा बूस्‍टर डोस

बृहन्‍मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्‍ये १८ ते ५९ वयोगटातील लाभार्थ्‍यांना बुधवार, दि. १ नोव्‍हेंबरपासून नाकावाटे घ्‍यावयाच्या इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) कोविड प्रतिबंधक लसीची प्रतिबंधात्‍मक मात्रा (प्रिकॉशन / बूस्‍टर डोस) देण्‍यास सुरुवात करण्‍यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्‍या वतीने मुंबई महानगरातील प्रत्येक प्रशासकीय विभागात एक यानुसार २४ लसीकरण केंद्रांवर २८ एप्रिल २०२३पासून ६० वर्षांवरील नागरिकांना तसेच २३ जून २०२३पासून आरोग्‍य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाकावाटे घ्‍यावयाच्‍या इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) कोविड-१९ लसीची प्रतिबंधात्‍मक मात्रा अर्थात प्रिकॉशन / बूस्‍टर डोस देण्‍यात येत आहे.

राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनेनुसार, पालिकेतर्फे १ नोव्‍हेंबर २०२३पासून इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) ही लस १८ ते ५९ वर्षं वयोगटातील लाभार्थ्‍यांना प्रिकॉशन / बूस्‍टर डोस म्हणून देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लसीचा हा प्रिकॉशन / बूस्‍टर डोस घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रिकॉशन डोस म्हणून इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लस देता येणार नसल्‍याचेदेखील पालिका प्रशासनातर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. पात्र मुंबईकरांनी इन्‍कोव्‍हॅक लसीचा बूस्‍टर डोस घ्‍यावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content