Friday, September 20, 2024
Homeपब्लिक फिगरअनिल परब यांचा...

अनिल परब यांचा दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट?

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून दापोली येथे बांधलेल्या अनधिकृत रिसॉर्टप्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागविला जाईल, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांच्या नेतृत्त्वाखालील एका शिष्टमंडळाला दिले.

भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांच्यासह खासदार गोपाळ शेट्टी, आमदार राम कदम, मिहीर कोटेचा, राहुल नार्वेकर, मुंबई महामंत्री संजय उपाध्याय, युवराज मोरे आणि सिद्धार्थ शर्मा यांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राच्या राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन अनिल परब यांचे बेकायदेशीर बांधकाम, सरकारी देस्तावेजात खाडखोड, अपारदर्शक आर्थिक व्यवहार यासंबंधी निवेदन व पुरावे दिले. त्यावेळी राज्यपालांनी हे आश्वासन दिले.

अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट, सीआरझेडच्या नियमांचा भंग, वन व पर्यावरणचे नुकसान, सरकारी दस्तावेजात खाडखोड व मंत्रीपदाच्या दुरुपयोगासंबंधी मला तक्रार व दस्तावेज मिळाले आहेत. यासंबंधी मी राज्याच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवणार आहे, असे राज्यपाल कोश्यारी या शिष्टमंडळाला म्हणाले.

अनिल परब

अनिल परब यांनी १९ जून २०१९ रोजी विभास साठे यांच्याकडून १ कोटी रुपये देऊन मुरुड येथील ४२ गुंठे शेत जमीन विकत घेतली. खरेदीखताप्रमाणे ५ मे २०१७ला अनिल परब यांनी या जागेचा कब्जा घेतला. परंतु कधीही ही जागा स्वत:च्या नावावर केली नाही. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सहनिबंधक यांच्याकडे सदानंद कदम यांच्या नावाने खरेदीखत करून परब यांनी ही जागा परस्पर सदानंद कदम यांच्या नावाने केली. ४ वर्षे परब यांनी ही जागा “बेनामी” मिळकत म्हणून स्वत:कडे ठेवली व रिसॉर्ट बांधला, असा आरोप सोमैया यांनी केला.

कोरोना काळात परब यांनी अनधिकृतरित्या २२ डिलक्स खोल्यांचा ३ मजली रिसॉर्ट या जमिनीवर बांधला. किरीट सोमैया यांनी ६ मे २०२१ रोजी दापोली येथे जाऊन या अनधिकृत रिसॉर्टसंबंधी खुलासा केला. परब यांनी भ्रष्टाचाराचा पैसा वापरून ही बेनामी मिळकत विकसित केली आहे. या रिसॉर्टसाठी कोणतेही परवाने घेण्यात आलेले नाहीत. परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. सीआरझेडची अनुमती नाही. खोटे कागदपत्र दाखविण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात दस्तावजात खाडाखोड करून आता हा रिसॉर्ट २०१९पूर्वीचा आहे असे अनिल परब यांनी घोषित केले, असेही सोमैया यांनी सांगितले.

अनिल परब यांनी ही जागा पुण्याचे विभास साठे यांच्याकडून विकत घेतली. सोमैया यांनी साठे यांच्याकडे व संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यावर हे स्पष्ट झाले आहे की, अनिल परब यांनी जागेचा ताबा घेतला त्यावेळी या शेतजमीनीवर एक फूटही बांधकाम नव्हते, झोपडेही नव्हते. यासंबंधीचे गुगल मॅप/अर्थचे नकाशेही राज्यपालांना भाजपाच्या शिष्टमंडळाने दाखविले.

राज्यपालांनी अनिल परब यांच्याविरुद्ध सीआरझेड भंग, अनधिकृत बांधकाम, बेनामी मिळकत, भ्रष्टाचाराचा पैसा वापरणे, मंत्रीपदाचा दुरुपयोग याबाबत गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या व्यवहाराची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) करावी असा आग्रह भाजपाने केला आहे.

Continue reading

राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरची बाजी

नांदेड येथे नुकत्याच झालेल्या २१व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण १९ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत विविध राज्यांतून ३००पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे...

गणेशोत्सव जपानमधला…

यंदाचे म्हणजे २०२४ हे वर्ष जपानमधील योकोहामा मंडळाचे ९वे वर्ष. जपानमधील योकोहामा मंडळ वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असतात. यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव. यावेळी मे महिन्यापासूनच गणेशागमनाचे वेध लागले होते. दरवर्षी योकोहामा गणेशोत्सव शनिवार-रविवार २ दिवस साजरा केला...

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...
error: Content is protected !!
Skip to content