केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंदाव्दारे खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाच्या (केव्हीआयसी) सहयोगाने कालपासून नागपूरच्या सिवील लाइन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनीचे उद्घाटन काल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
यावेळी त्यांनी विविध खादी उत्पादनाच्या स्टॉल्सना भेट दिली आणि उत्पादक-विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी केव्हीआयसी नागपूर विभागाचे संचालक राघवेंद्र महिंद्रकर उपस्थित होते.
‘वोकल फॉर लोकल’ या अंतर्गत खादीच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण भारतभरातून विविध खादी उत्पादनांचे स्टॉल या प्रदर्शनीदरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत पदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध राहतील. या प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन केव्हीआयसी नागपूर विभागाव्दारे करण्यात आले आहे.