Friday, October 18, 2024
Homeचिट चॅटशिवचरित्रपर अभिवाचनाने मंत्रालयात...

शिवचरित्रपर अभिवाचनाने मंत्रालयात झाला वाचन प्रेरणा दिन!

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शुक्रवारी मुंबईत, मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिवाचन आणि काव्यवाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.

मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच भाषेच्या प्रचार व प्रसाराच्या हेतूने राज्याच्या मराठी भाषा विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अभिवाचनासाठी शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त ‘350वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव शिवचरित्रपर पुस्तकाच्या वाचनाचा’ हा विषय निवडण्यात आला.

या अभिवाचन आणि काव्यवाचन कार्यक्रमात ज्ञानेश पाटमासे, अतुल कुलकर्णी, अजय सावद, दीपक दळवे, अरविंद शेटे, अनघा पटवर्धन, सोनाक्षी पाटील, शिल्पा नातू, सारिका चौधरी, पूजा भोसले, मंगल नाखवा आदींनी सहभाग घेऊन वृत्तपत्रातील लेख, शिवचरित्रात्मक पुस्तकांतील उतारा, कविता वाचन, ओवी गायन, गीत गायन, बखरीतील लेख, शिवरायांचे मूळ मोडी लिपितील पत्र व त्याबाबतचे विवेचन असे विविधांगी वाचन आणि गायन सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन वासंती काळे यांनी केले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रदर्शनदेखील आयोजित करण्यात आले. यात मराठी भाषा विभागाच्या अखत्यारीतील विविध मंडळे, शासकीय मुद्रणालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या स्टॉलचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content