महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी मेधा गाडगीळ यांची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) येथे सदस्य (प्रशासन) या पदावर नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. १९८३ च्या बॅचच्या निवृत्त आयएएस अधिकारी मेधा गाडगीळ यांच्या रूपाने तब्बल २९ वर्षांनंतर महाराष्ट्रात एका महिला अधिकाऱ्यास हा बहुमान मिळत आहे.
मॅटच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांच्या उपस्थितीत नुकतीच मेधा गाडगीळ यांनी सुत्रे स्वीकारली. मेधा गाडगीळ यांनी आपल्या ३६ वर्षांच्या सेवेत सहाय्यक जिल्हाधिकारी (ठाणे), जिल्हाधिकारी अहमदनगर, सहसंचालक ऊद्योग, संचालक हाफकीन बायो., अप्पर मुख्य सचिव गृह (अपिल) व अ. मु. स. वैद्यकीय शिक्षण यासारख्या अनेक पदांवर काम केले आहे.