Homeचिट चॅटकांदेवाडीतल्या श्री अक्कलकोट...

कांदेवाडीतल्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठाला होणार सव्वाशे वर्षं…

मुंबईच्या गिरगावातील कांदेवाडी येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठाला ८ ऑक्टोबर २०२३ रोजी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ५ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

५ आणि ६ ऑक्टोबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संघ मंदिर येथे ७ ऑक्टोबरला होणाऱ्या भव्य उद्घाटन कार्यक्रमात स्वामी समर्थ भक्तांचे स्वामीविषयींची श्रद्धा तसेच अनुभव यांचे निवडक वाचन होईल. हे अनुभव २३ सप्टेंबरपर्यंत पोहोचतील, असे पाठवावेत. यावेळी मान्यवरांचा सत्कारदेखील होईल.

गुरू अर्चना पालेकर यांच्या संस्थेतर्फे श्री गुरुदेव दत्त हा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रमदेखील होईल. त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचे गायन होईल. ८ ऑक्टोबरला मठात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सकाळी लघुरुद्राभिषेक, दुपारी चार वाजता श्री समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा गजर आणि रात्री ७.४५ वाजता आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. अधिकाधिक भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वस्त प्रशांत मुळेकर यांनी केले आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content