Homeचिट चॅटतीन प्रवास कंपन्यांच्या...

तीन प्रवास कंपन्यांच्या अधिग्रहणासाठी ईझमायट्रिप सज्ज!

भारतातील सर्वांत मोठा ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म ईझमायट्रिपडॉटकॉमने भारतातल्या तीन मोठ्या प्रवास कंपन्यांचे अधिग्रहण करण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी बोर्डाने मंजूरी दिल्याची घोषणा कंपनीने केली आहे. या कंपन्यांचा एकत्रित पेड-अप समभाग भांडवलाच्या ५१ टक्के भागभांडवल ईझमायट्रिपद्वारे संपादित केले जाणार आहेत.

कंपनी अधिग्रहण करणार असलेल्या निवडक कंपन्यांमध्ये गाईडलाईन ट्रॅव्हल्स हॉलिडेज इंडिया प्रा. लि., मुंबई; ट्रिपशोप ट्रॅव्हल्स टेक्नोलॉजीज प्रा. लि., जम्मू व काश्मीर; डूक ट्रॅव्हल्स प्रा. लि., नवी दिल्ली या प्रमुख तीन कंपन्यांचा समावेश आहे. प्रवास व पर्यटनाच्या क्षेत्रातील मोठी कंपनी म्हणून आपले स्थान भक्कम करण्यासाठी कंपनी ही अधिग्रहणे करत आहे.

संबंधित कंपन्यांमधील समभाग विकणाऱ्या समभागधारकांना आपले इक्विटी समभाग प्राधान्यतत्त्वाने जारी करून, ईझमायट्रिप, या प्रस्तावित अधिग्रहणांचा मोबदला देणार आहे. ईझमायट्रिप हा प्लॅटफॉर्म सर्वार्थाने भारतातील पसंतीच्या प्रवास सहयोगींपैकी एक आहे आणि बाजारातील अस्तित्त्व ठळक करण्यासाठी कंपनी सक्रियपणे अन्य कंपन्यांचे अधिग्रहण करून विस्तार साधत आहे.

ईझमायट्रिपचे सहसंस्थापक निशांत पिट्टी या अधिग्रहणांबद्दल म्हणाले की, या तिन्ही कंपन्यांची कामगिरी उत्तम आहे आणि त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रांमधील गाढ अनुभव आहे. या लक्षणीय ट्रॅव्हल कंपन्यांच्या साथीने आम्ही अधिक मोठ्या बाजारपेठांना दिल्या जाणाऱ्या विस्तृत सेवांच्या क्षेत्रात विस्तार करू शकू. असंख्य शोधकांची चौकसबुद्धी जागवण्यासाठी, प्रत्येकाला आपलासा वाटणारा अविस्मरणीय प्रवास घडवण्यासाठी आणि शोध व साहसाच्या रंगांनी जग रंगवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे सज्ज आहोत.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content