Homeकल्चर +आज व उद्या...

आज व उद्या पाहा दादासाहेब फाळकेंवरील चरित्रपट!

दादासाहेब फाळके (1870 -1944) म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुंडिराज गोविंद फाळके यांनी भारताला चित्रपटकलेची ओळख करून दिली आणि देशवासियांसमोर अमर्याद कल्पनेचे द्वार खुले करून  दिले. त्यांच्या दूरदर्शी आकांक्षेमुळे, आजच्या भरभराट झालेल्या भारतीय करमणूक उद्योगाची आधारशीला बलवान‌ झाली.

30 एप्रिल 2021 रोजी भारतीय सिनेमाचे जनक म्हणून ओळखल्या जाणार्‍या या आख्यायिकेला, त्यांच्या 151व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी फिल्म डिव्हिजन, आज दिनांक 29 आणि उद्या, 30 एप्रिल, 2021 रोजी माहितीपट आणि अ‍ॅनिमेशन चित्रपटांचा दोन दिवसीय महोत्सव आयोजित करीत आहे.

हे  माहितीपट फिल्म्स डिव्हिजनच्या https://filmsdivision.org/ आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision या संकेतस्थळांवरून प्रदर्शित केले जातील.

एफडीचे संकेतस्थळ आणि यू ट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांत खालील चित्रपटांचा समावेश आहे:

ड्रीम टेक्स विंग्ज (16 मिनिटे / इंग्रजी / 1972 / गजानन जागीरदार)- दादासाहेब फाळके यांच्यावरील चरित्रपट

फाळके चिल्ड्रन (20 मिनिटे / इंग्लिश / 1994 / कमल स्वरूप)- फाळकेंवरील चरीत्रपट ज्यात त्यांच्या हयात असलेल्या मुलांच्या आणि कौटुंबिक छायाचित्रांच्या अंशाच्या आठवणीतून त्यांचे जीवन आणि कार्य यांचा मागोवा घेणारा चित्रपट.

द पी प्लांट लीगसी (11 मिनिटे / संगीत / 2015 / राम मोहन)- दादासाहेब फाळके यांच्यावरील अँनिमेशन पट

ट्रेसिंग फाळके (102  मिनिटे / इंग्रजी /2015 / कमल स्वरूप)- एक अ‍ॅनिमेशन चित्रपट- फाळके जिथे राहत असत आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या ज्या लोकांसह कार्य करत असत, त्या ठिकाणांचा मागोवा घेत, त्यांच्या आयुष्याची कथा सांगण्याचा प्रयत्न चित्रित करणारा चित्रपट.

रंगभूमी (90 मिनिटे / हिंदी / 2013 / कमल स्वरूप)- काही कल्पित काही सत्य आणि  माहिती यांचे मिश्रण असलेला, फाळकेंच्या वाराणसीतील जीवनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणारा एक माहितीपट, ज्यात त्यांनी भ्रमनिरास होऊन सिनेमाच्या दुनियेतून माघार घेतली आणि रंगभूमी सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्या विषयीचा चित्रपट.

Continue reading

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात उभा राहतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...
Skip to content