Homeचिट चॅटट्रिपल ‘महाराष्ट्र केसरी’...

ट्रिपल ‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी झाला जगज्जेता!

महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू, तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरीने भारतासाठी सोनेरी कामगिरी केली. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती, या खेळात कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करीत त्याने भारताचे नाव उंचावत जगज्जेतेपद पटकावले.

जागतिक पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरीचा उपांत्य फेरीत गतविजेता आणि संभाव्य विजेत्या जेसी साहोताशी सामना झाला. अटीतटीच्या सामन्यात त्याने साहोताचा ११-०८ अशा फरकाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. या विजयानंतरच विजयचे जगज्जेतेपद निश्चित झाले होते. अंतिम सामन्यात त्याने अमेरिकेच्या जे. हेलिंगरवर १० गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना ११-०१ ने जिंकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बागली या गावचा विजय चौधरी हा महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. याशिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेतेपद, तसेच अनेक मानाच्या कुस्त्यांमध्ये बाजी आणि राष्ट्रीय सुवर्णपदकावरदेखील विजय चौधरीने आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. चौधरीला काही महिन्यांपासून प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते आणि पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाईम झोननुसार प्रशिक्षण देत होते. महाराष्ट्रातील एक नामांकित आणि प्रतिष्ठित कुस्तीपटू विजय चौधरी आता जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून भारताचा नवीन ‘रेसलिंग सेनसेशनल’ बनला आहे.

माझा विजय भारतीय पोलिसांना अर्पण

काही महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच मी ठरवले होते की मला जागतिक पोलीस खेळांमध्ये माझ्या देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद झाल्याची प्रतिक्रिया जगज्जेत्या विजय चौधरीने विजयानंतर व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य पोलीस विभागातील माझ्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सततच्या पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाला. मी हा विजय भारतातील प्रत्येक पोलीस अधिकार्‍याला समर्पित करतो जो देशाला प्रथम स्थान देऊन समाजाची २४ तास सेवा करत असतो. हे सुवर्णपदक मी संपूर्ण भारतीय पोलीस दलाला समर्पित करत असल्याचेही चौधरीने अभिमानाने सांगितले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content