Homeचिट चॅटआसुम्ता कॉन्व्हेंटच्या निमित्ताने...

आसुम्ता कॉन्व्हेंटच्या निमित्ताने विशेष टपाल तिकीट

गोवा टपाल विभागाने सारझोरा-चिंचोलणे येथील आसुम्ता कॉन्व्हेंट हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले. गोवा टपाल विभागाचे वरिष्ठ टपाल अधीक्षक जी. एस. राणे यांनी आसुम्ता कॉन्व्हेंट हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. जेसी, माजी शिक्षक रोलांडो डी मेलो आणि गोवा फिलाटेलिक अँड न्यूमिस्मॅटिक सोसायटीचे सचिव यांच्या उपस्थितीत विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन केले.

गोवा टपाल विभागाने शाळेच्या माध्यमातून प्रथमच टपाल तिकीट प्रकाशित केले. २०१९ पासून आसुम्ता फिलाटेलिक अँड न्यूमिस्मॅटिक क्लबचे सदस्य असलेल्या या शाळेला टपाल विभागाकडे नोंदणीकृत पहिली शाळा होण्याचा मान मिळाला आहे.

आसुम्ता कॉन्व्हेंट हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना टपाल तिकिटे गोळा करण्याचा छंद जोपासण्यासाठी जी. एस. राणे यांनी प्रोत्साहन दिले आणि या अनोख्या विशेष टपाल तिकिटाचे कौतुक केले.

7 जुलै 2023 पासून एक महिन्याच्या कालावधीसाठी टपाल ग्राहक आणि फिलेटलिस्टच्या मागणीनुसार विशेष टपाल तिकीट चिंचोलणे टपाल कार्यालयात उपलब्ध असल्याचे टपाल खात्याने कळवले आहे.

Continue reading

जान्हवी मोरे स्मृती चषक कॅरम स्पर्धा २९ एप्रिलला

डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षांखालील‌ मुला-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शास्त्री हॉल, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. स्पर्धेचे प्रवेशशुल्क रुपये १००...

मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची लक्षणीय झेप

भारतीय संघाने 15व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गणितात अपवादात्मक कौशल्य आणि चिकाटीचे प्रदर्शन करत, चार सदस्यीय भारतीय पथकाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके पटकावली. ऐतिहासिक कामगिरी करत या स्पर्धेत भारतीय...

एलआयसीची ग्राहक आणि एजंटसाठी दोन स्वतंत्र मोबाईल ॲप लॉन्च!

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी काल मुंबईत एलआयसीचे नवीन ग्राहक ॲप (मायएलआयसी) आणि विक्री मध्यस्थांसाठीचे (एजंट) मोबाईल ॲप (सुपर सेल्स साथी) यांचे अनावरण केले. 26 कोटींहून अधिक पॉलिसी आणि भारतातील सर्वात व्यापक विमा पदचिन्हासह...
Skip to content