Homeचिट चॅटफ्रांसच्या ‘बॅस्टिल डे’...

फ्रांसच्या ‘बॅस्टिल डे’ पथसंचलनासाठी सैन्यदलांचे पथक रवाना!

14 जुलै हा दिवस फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस (Fête Nationale Française) म्हणून साजरा केला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात, 1789 मध्ये याच दिवशी, बॅस्टिलपासून, या क्रांतीची ठिणगी पेटली होती. या वर्षी बॅस्टिल डेच्या कार्यक्रमाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी होणाऱ्या पथसंचलनात, भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही सेवांच्या 269 जवानांचे पथक फ्रांसच्या सैन्यासोबत सहभागी होणार आहेत. त्यासाठीच हे पथक नुकतेच फ्रांसला रवाना झाले.

भारतीय सैनिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपले शौर्य जगाला दाखवले होते, या पराक्रमासाठी भारतीय सैनिकांना अनेक शौर्य पुरस्कारही प्रदान करण्यात आले आहेत.

यावर्षी दोन्ही देशांच्या राजनैतिक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून, दोन्ही देशांचे सैन्य संयुक्त सरावात भाग घेणार असून आपल्या अनुभवांचे आदानप्रदान करणार आहेत. गेल्या काही वर्षांत भारत आणि फ्रान्स विश्वसनीय संरक्षण भागीदारही बनले आहेत.

कॅप्टन अमन जगताप 77 मार्चिंग जवान आणि बँडचे 38 सदस्य असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करत आहे. भारतीय नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व कमांडर व्रत बघेल तर भारतीय हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर सिंधू रेड्डी करत आहेत. भारतीय हवाई दलाची राफेल लढाऊ विमाने देखील पथसंचलनादरम्यान फ्लाय पास्टचा भाग बनतील.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content