Homeचिट चॅटईदनिमित्‍त देवनार पशुवधगृहात...

ईदनिमित्‍त देवनार पशुवधगृहात दीड लाखांहून जास्त शेळया-मेंढयांची विक्री

आशिया खंडातील सर्वात मोठे पशुवधगृह असा लौकिक असणाऱ्या बृहन्‍मुंबई  महानगरपालिकेच्‍या देवनार पशुवधगृहात बकरी ईदनिमित्‍त मोठ्या संख्येने जनावरे दाखल झाली होती. त्‍यात १ लाख ७७ हजार २७८ शेळया-मेंढयांचा तर १६ हजार ३५० म्‍हैसवर्गीय जनावरांचा समावेश होता. त्‍यापैकी १ लाख ६८ हजार ४८९ शेळया-मेंढयांची व १६ हजार ३५० म्‍हैसवर्गीय जनावरांची विक्री झाली.

गेल्या आठवड्यात झालेल्या बकरी ईद सणानिमित्त मुंबई महापालिकेच्‍या देवनार पशुवधगृह परिसरात संबंधित विक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही पालिकेतर्फे करण्यात येते. या अनुषंगाने देवनार पशुवधगृहातील सेवासुविधा अधिकाधिक प्रभावीपणे देता याव्‍यात यासाठी पालिका प्रशासन सातत्‍याने प्रयत्न करत आहे. बकरी ईद सणाच्या निमित्ताने देवनार पशुवधगृहात सर्व प्रकारच्या व्यवस्थांचे चोख नियोजन व आयोजन करण्यात आले होते.

गेल्या आठवड्यात झालेल्‍या ‘बकरी ईद’ (ईद – उल – झुआ) सणाला देवनार पशुवधगृहात दरवर्षीप्रमाणेच देशाच्‍या विविध भागातून विक्रेते दाखल झाले होते. साधारणपणे सणाच्‍या १० ते १५ दिवस आधी हे विक्रेते देवनार पशुवधगृहात दाखल झाले होते. त्यांच्‍यासोबतच १ लाख ७७ हजार २७८ बकरे आणि १६ हजार ३५० म्‍हैसवर्गीय जनावरे दाखल झाली होती. त्‍यापैकी १ लाख ६८ हजार ४८९ शेळया-मेंढयांची व १६ हजार ३५० म्‍हैसवर्गीय जनावरांची विक्री झाली.

देवनार पशुवधगृहाच्‍या ६४ एकराच्‍या प्रशस्‍त जागेत ‘बकरी ईद’निमित्‍त बकरे व म्‍हैसवर्गीय जनावरांच्‍या स्‍थायी स्‍वरूपातील निवास क्षमतेसह ७७ हजार चौरस मीटर जागेवर अतिरिक्‍त निवारा केंद्र (शेल्‍टर्स), मंडप उभारण्‍यात आले होते. जनावरांसाठी पाणी, चारा, प्राथमिक पशुवैदयकीय आरोग्‍य केंद्र यांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. पशुवधगृहातील ‘म्हैस धक्का’ येथे जनावरांसाठी नवीन शेड उभारण्यात आले होते. शिवाय पूर्वीच्या शेडचीदेखील दुरूस्ती करण्यात आली होती. ‘म्हैस धक्का’ येथे शासनाच्‍या पशुसंवर्धन विभागाच्‍या अखत्यारीतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी विक्रीकरिता आणलेल्या जनावरांची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीनंतरच ही जनावरे विकण्याची अनुमती देण्यात येत होती.

मोठया संख्‍येने खरेदीदार येत असल्‍याने याठिकाणी एका भागात ‘फूड झोन’ उभारण्यात आले होते. त्यामुळे अभ्यागतांची सोय झाली होती. तसेच अभ्यागतांसाठी पाणपोईदेखील उभारण्यात आल्या होत्‍या. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी विविध ठिकाणी टाक्याही बसविण्यात आल्या होत्‍या. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने प्रत्येक वाड्याजवळ ५ हजार लीटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्‍या.

प्रभावी सुरक्षाव्‍यवस्‍थेसाठी यंदा देवनार पशुवधगृह परिसरात ३०० ‘क्‍लोज सर्किट टेलीव्हिजन कॅमेरे’ (सीसीटीव्‍ही) कॅमेरे लावण्‍यात आले होते. त्‍याचसोबत पॅन – टिल्‍ट – झूम (पीटीझेड)ची सुविधा असणारे १२ टेहाळणी कॅमेरे, १ व्हिडिओ वॉल, ५ एलईडी स्‍क्रीनही लावण्‍यात आले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हँडमेटल डिटेक्टर, वॉकीटॉकी, डोअरमेटल डिटेक्टर इत्यादी अत्याधुनिक उपकरणांसह सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. यामुळे पालिकेच्‍या सुरक्षा विभागाला आणि मुंबई पोलिस दलास नियंत्रण कक्षातून देवनार पशुवधगृह परिसरावर देखरेख ठेवणे सहज शक्‍य झाले होते.

साफसफाईची व्‍यवस्‍था राहवी याकरिता पशुवधगृहाच्‍या परिसरात श्रमिक अहोरात्र कार्यरत होते. परिसरातील कचरा व मृत जनावरे उचलून नेण्‍यासाठी अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. त्‍याचबरोबर नागरिकांच्‍या सोयीसाठी शौचालये, मोबाईल टॉयलेटची व्‍यवस्‍थादेखील करण्‍यात आल्‍याचीही माहिती महाव्‍यवस्‍थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content