Homeचिट चॅटपहिल्या सहामाहीत ऑडी...

पहिल्या सहामाहीत ऑडी कारच्या विक्रीत 97% वाढ!

ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने प्रबळ मागणी, लक्झरी कार विभागात विकास, विकसित होते असलेले डेमोग्राफिक्स आणि अनुकूल आर्थिक स्थितींच्या आधारावर प्रबळ विक्री कामगिरी कायम ठेवली. ब्रॅण्डने जानेवारी ते जून २०२३ या कालावधीमध्ये ३,४७४ युनिट्सची विक्री केली आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ९७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, पुरवठ्यासंदर्भात आव्हाने आणि वाढता इनपुट खर्च असताना देखील वर्षाच्या पहिल्या सहामाहीमधील आमच्या कामगिरीने वर्षातील यशस्वी दुसऱ्या सहामाहीसाठी पाया रचला आहे. आमचे व्हॉल्यूम मॉडेल्स ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी क्यू५, ऑडी ए४ आणि ऑडी ए६ यांना प्रबळ मागणी मिळत आहे. आमच्या टॉप-ऑफ-द-लाइन कार्स ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी क्यू८ एल, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू८ आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी हे देखील उत्तम आकडेवारींसह विकसित होत आहेत. आमच्या इलेक्ट्रिक श्रेणीमधील नवीन मॉडेल ऑडी क्यू८ ई-ट्रॉन लवकरच लाँच करण्यात येईल आणि आम्हाला या विभागामध्ये देखील यश मिळण्याचा आत्‍मविश्वास आहे.

२०२३ च्या पहिल्या सहामाहीत ऑडी अप्रूव्ह्ड प्लस (पूर्व-मालकीचा कार व्‍यवसाय) ५३ टक्क्यांनी वाढला. ऑडी इंडियाने भारतातील आपला पूर्व-मालकीचा कार व्यवसाय ऑडी अप्रूव्ह्ड प्लसचे विस्तारीकरण सुरू ठेवले आहे. सध्या देशातील सर्व प्रमुख ठिकाणी पंचवीस ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस सुविधांसह कार्यरत असलेला ब्रॅण्ड विस्तार करत आहे आणि २०२३ च्या अखेरपर्यंत सत्तावीस पूर्व-मालकीच्या कार सुविधा असतील.

इलेक्ट्रिफिकेशन धोरणाला अधिक पुढे नेत ऑडी इंडियाने नुकतेच ईव्ही मालकांसाठी उद्योगातील पहिला उपक्रम – ‘मायऑडीकनेक्ट’ अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’ची घोषणा केली. हे एक-थांबा सोल्यूशन आहे, जे ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच अॅपवर विविध इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग सहयोगींची माहिती देते. सध्या ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी ७५० हून अधिक चार्ज पॉइण्ट्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पुढील काही महिन्यांत अधिक भर होईल.

ऑडी इंडिया उत्पादन पोर्टफोलिओ: ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी क्यू५, ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू८, ऑडी ई-ट्रॉन ५०, ऑडी ई-ट्रॉन ५५, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक ५५, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content