Homeचिट चॅट17वा "सांख्यिकी दिन"...

17वा “सांख्यिकी दिन” देशभरात साजरा!

सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात (दिवंगत) प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकार 2007 पासून दरवर्षी 29 जून हा त्यांचा जयंतीदिन  “सांख्यिकी दिन” म्हणून साजरी करते.

यावर्षी, सांख्यिकी दिन, 2023 चा मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीत लोधी रोड येथील स्कोप कन्व्हेन्शन सेंटर, स्कोप कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (स्वतंत्र प्रभार), नियोजन मंत्रालय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. मंत्रालयाच्या सोशल मीडिया हँडलवरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या  निबंध लेखन स्पर्धा, 2023’ च्या विजेत्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे उपमहासंचालक डॉ. आशुतोष ओझा यांनी  सांख्यिकी दिन, 2023 च्या संकल्पनेवर एक संक्षिप्त सादरीकरण केले. भारतासाठी संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक शॉम्बी शार्प, नीती आयोगाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. योगेश सुरी आणि नीती आयोगाचे संचालक राजेश गुप्ता यांनी  सांख्यिकी दिन, 2023 च्या संकल्पनेवर उपस्थितांना संबोधित केले.

या कार्यक्रमादरम्यान शाश्वत विकास उद्दिष्टे-राष्ट्रीय निर्देशांक आराखडा, प्रगती अहवाल, 2023 प्रसिद्ध करण्यात आला. अहवालाबरोबर, शाश्वत विकास उद्दिष्टे-राष्ट्रीय निर्देशांक आराखडा 2023 आणि शाश्वत विकास उद्दिष्टे-राष्ट्रीय निर्देशांक आराखडा, 2023 वरील डेटा स्नॅपशॉट देखील प्रसिद्ध करण्यात आला.

अर्थशास्त्र, नियोजन आणि सांख्यिकी क्षेत्रात (दिवंगत) प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी  दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकार 2007 पासून दरवर्षी त्यांची जयंती 29 जून रोजी “सांख्यिकी दिन” म्हणून साजरी करते. देशाच्या विकासासाठी सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये आकडेवारीची भूमिका आणि महत्त्व याविषयी, विशेषतः तरुण पिढीमध्ये जनजागृती करणे हा सांख्यिकी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. या वर्षी, सांख्यिकी दिन, 2023 साठी निवडलेली संकल्पना शाश्वत विकास उद्दिष्टांवर देखरेखीसाठी राष्ट्रीय निर्देशांक आराखड्यासह राज्य निर्देशांक आराखड्याचे संरेखन अशी आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या फिल्ड ऑपरेशन विभाग, मुंबई ने आज मुंबईतील विद्याविहार येथील एस.के.सोमय्या महाविद्यालयात एस.के.सोमय्या महाविद्यालय, मुंबई च्या सहकार्याने सांख्यिकी दिन, 2023 यशस्वीरित्या साजरा केला.

सांख्यिकी दिनाच्या सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून आणि भारतीय सांख्यिकीचे जनक दिवंगत प्रशांत चंद्र महालनोबिस यांना पुष्पांजली अर्पण करून झाली. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. आर.बी.बर्मन ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून उपस्थित होते. भारताच्या वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी आणि एम.एल. डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर डोके हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या फिल्ड ऑपरेशन विभागाच्या उपमहासंचालक सुप्रिया रॉय यांनी त्यांच्या बीजभाषणात शाश्वत विकास उद्दिष्टांवर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रीय निर्देशांक आराखड्यासह राज्य निर्देशांक आराखड्याचे संरेखन’ या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार आणि मते मांडली. उपस्थितांना संबोधित करताना डॉ. आर बी बर्मन यांनी आर्थिक विकासाच्या व्यापक मुद्द्यांवर तसेच विकास आणि समानता यावर भर दिला.

वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांनी धोरण आखणी आणि जबाबदार उत्पादनाद्वारे उद्योगाची शाश्वतता प्राप्त करण्याचा प्रयत्न म्हणून सर्व स्तरांवर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये मदत म्हणून सांख्यिकीय डेटाचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले एम.एल. डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर डोके यांनी सांख्यिकी आणि भारतीय सांख्यिकी प्रणालीच्या भूमिकेबाबत आपले विचार व्यक्त केले ज्यामुळे विविध शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग सुकर होईल. कार्यक्रमात सुमारे 120 हून अधिक जण सहभागी झाले होते ज्यात विभाग प्रमुख, शिक्षक आणि मुंबईतील विविध महाविद्यालयातील सांख्यिकीचे विद्यार्थी यांचा समावेश होता. एनएसएसओ आणि डीईएसचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content