Friday, September 20, 2024
Homeडेली पल्सखुश राहणे म्हणजेच...

खुश राहणे म्हणजेच मिले सूर, मेरा तुम्हारा..

20 मार्च हा आंतरराष्ट्रीय हॅपीनेस डे म्हणून साजरा केला जातो. ऑक्सफर्ड डिक्शनरीप्रमाणे हॅपीनेस म्हणजे खुश असण्याची किंवा खुश राहण्याची अवस्था. खुश राहणे (Happiness) कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण खुश राहण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो. प्रत्येकाची खुशीची परिभाषा वेगवेगळी असते.

कोण पैसा कमवण्यात, ऐशोआरामात सुख मानतात तर कोणी इतरांसाठी काही केल्याने खुश होतात. प्रत्येकाचा खुश होण्याचा “अंदाज अपना अपना असतो” आपल्याला आलेले अनुभव, आपला शैक्षणिक व सामाजिक स्तर, करिअर, यश, लोकप्रियता आणि अचिव्हमेंट्स इतर अनेक गोष्टींवर खुशी अवलंबून असते.

असो! पण ही अवस्था कायम स्वरूपाची नसून क्षणिक असते. सुखी माणसाचा सदरा  आपल्यालाही मिळावा या मोहात आपण प्रत्येकजण कधी ना कधी पडतोच. कारण, खुश  राहण्याचे अनंत फायदे आहेत. खुश राहणारी व्यक्ती सर्वांनाच प्रिय असते. त्यांची सपोर्ट सिस्टीम फार चांगली असते. खुश राहणारी व्यक्ती सर्वांनाच हवीहवीशी वाटते.

खुश राहणाऱ्या व्यक्ती जास्त सक्रिय, प्रोडक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह असतात. खुश राहणाऱ्या व्यक्ती आयुष्यात जास्त यशस्वी होतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खुश राहणाऱ्या व्यक्ती जास्त निरोगी आयुष्य जगतात. खुश राहिल्याने डोपामीन, एनडॉर्फीन्स, सीरोटोनीनसारखे हॅपी हार्मोन्स जास्त प्रमाणात निर्माण होतात.

आयुर्वेदाने सुखाची सुटसुटीत व्याख्या केली आहे. “सुख संज्ञकम् आरोग्यम्विकारो दुःखम् एवं च।” आरोग्य म्हणजे सुख आणि विकार म्हणजे दु:ख! आरोग्य म्हणजे काय? महर्षी चरकांच्या मताप्रमाणे आरोग्य म्हणजे आत्मा, इंद्रिय व मन यांची प्रसन्नता. किती चपखल व्याख्या आहे ही! खुश राहणेम्हणजे फक्त हसीमजाक, मस्करी नाही. कारण हसणं हे फसवं असू शकतं पण प्रसन्नता फसवी असूच शकत नाही. प्रसन्नता ही आंतरिक ऊर्जा आहे.

बरेचसे विकार हे सायकोसोमॅटिक असतात. काम, क्रोध, चिंता, द्वेष, मोह, मत्सर हे  मनोविकार शरीरातील feel good hormonesचे प्रमाण कमी करून stress hormones वाढवतात जे शरीराची प्रतिकारक्षमता कमी करतात. याउलट प्रसन्न व खुश राहिल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनशक्ती वाढते. प्रसन्न राहणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक थकवा, एकाकीपणा, नीरसता आजुबाजूलाही फिरकत नाही. कार्यक्षमता वाढते. म्हणून निरोगी  राहण्यासाठी प्रसन्न राहणे गरजेचे आहे. क्षणिक असणारी खुशी दीर्घकाळ कशी टिकवून ठेवायची हे आपल्याच हातात आहे. खरं कि नाही?

व्यर्थ चिंता टाळा. इतरांशी स्पर्धा टाळा. आपली स्पर्धा स्वत:शीच असते. आपल्या उणीवा दूर करण्यासाठी सतत  प्रयत्नशील राहा. अधिकाधिक आनंदी व प्रसन्न राहा. याने सकारात्मकता वाढते. स्वत:ला सकारात्मक गोष्टीमध्ये व्यस्त ठेवा. नियमित व्यायाम, योगाभ्यास, मेडिटेशन, योग्य सात्त्विक आहार याने मनाची प्रसन्नता वाढते. आपल्या आवडीच्या गोष्टी करा. छंद जोपासा. स्वत:बरोबर आपल्याबरोबरच्या माणसांची काळजी घ्या. सर्वांशी सकारात्मकतेने वागा. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करा. आपल्या सांस्कृतिक तत्त्वांचा व मूल्ल्यांचा आदर करा व पालन करा.

भूतान हा हिमालयाच्या कुशीत वसलेला अतिसुंदर चिमुकला देश! पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एका बिझनेस मॅगझिनच्या पाहणीनुसार, भूतान हा जगातील सर्वात आनंदी आहे. स्वर्गीय निसर्गसौंदर्याचे सान्निध्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि प्रसारमाध्यमांचा आवश्यक तेवढाच  वापर आणि आपल्या सांस्कृतिक मूल्यांची जपणूक यामुळे भूतानने ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स वाढता ठेवून आध्यात्मिक तसेच आर्थिकही प्रगती केली आहे. या सुंदर छोट्याशा देशाकडून ही गोष्ट शिकण्यासारखी नाही का?

5 COMMENTS

  1. Very informative article. Every one is looking around to get happiness in life and it has various ways to get and achieve, Dr sandhya has very well elaborated the meaning and ways to get happiness in life , which is certainly very importsntvin everyone’s day to day life.

  2. लेख अप्रतिम आहे. आनंदी जीवनाचा मार्ग मार्ग आहे. धन्यवाद धन्यवाद

Comments are closed.

Continue reading

रंग माझा वेगळा..

ती तिच्या लहानग्या बाळाला घेऊन केबिनमध्ये आली. त्याच्या चेहऱ्याची विशिष्ट ठेवण, सपाट चेहरा, दोन डोळ्यांमध्ये अजून एक डोळा मावेल एवढे अंतर, नाकाचा सपाट पूल, वरच्या पापणीजवळ असेलेली त्वचेची घडी, छोटी मान आणि हातापायांच्या बोटांची विशिष्ट ठेवण, हे सर्व बघून...
error: Content is protected !!
Skip to content