Homeचिट चॅटपर्यटक वाहनचालकांसाठी नवीन...

पर्यटक वाहनचालकांसाठी नवीन योजना जाहीर!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यटक वाहनचालकांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत कोणताही पर्यटक वाहनचालक ऑनलाईन पद्धतीने “अखिल भारतीय पर्यटक प्राधिकरण / परवाना”साठी अर्ज करू शकतो. अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत संबंधित कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि शुल्क जमा झाल्यानंतर परवाना जारी केला जाईल.

पर्यटक वाहनचालकांसाठी १ एप्रिलपासून नियम लागू

”अखिल भारतीय पर्यटक वाहन प्राधिकृत आणि परवाना नियम 2021” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नवीन नियमांचा सामान्य वैधानिक आदेश 166(इ) 10 मार्च 2021 रोजी प्रकाशित झाला आहे. नवीन नियम १ एप्रिल २०२१पासून लागू होतील. सर्व विद्यमान परवाने त्यांच्या वैधतेपर्यंत लागू राहतील.

पर्यटनाला मिळणार दूरगामी चालना

या नवीन नियमांमुळे आपल्या देशातील विविध राज्यांमधील पर्यटनाला दूरगामी चालना मिळणे अपेक्षित आहे. यासह राज्य सरकारांच्या महसुलातही वाढ होईल. परिवहन विकास परिषदेच्या 39व्या आणि 40व्या बैठकीत उचलण्यात आलेल्या या पावलांवर चर्चा झाली आणि आणि या परिषदेत सहभागी राज्यातील प्रतिनिधींकडून याबाबत प्रशंसा करण्यात आली आणि सहमती झाली. मालवाहतूक वाहनांना राष्ट्रीय परवाना पद्धतीअंतर्गत यशस्वीरीत्या आणल्यानंतर मंत्रालयाने, पर्यटक प्रवासी वाहनांची वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने हे नवीन नियम जारी केले आहेत.

तीन महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत

याशिवाय, तीन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा एका वेळी तीन वर्षांपर्यंतच्या  कालावधीसाठी, प्राधिकृत / परवान्याच्या स्वरूपात ही योजना परिवर्तनाची अनुमती देते. आपल्या देशात पर्यटनाचा हंगाम मर्यादित आहे आणि त्यादृष्टीने ज्या वाहनचालकांकडे मर्यादित आर्थिक क्षमता आहे अशा बाबींना लक्षात घेऊन ही तरतूद समाविष्ट केली गेली आहे. यामुळे प्राधिकृत / परवाना संदर्भातील केंद्रीय संकलित माहिती आणि शुल्क एकत्रित करून पर्यटकांची ये-जा, सुधारणेला वाव आणि पर्यटनाला चालना देण्याची संधी मिळेल.

गेल्या पंधरा वर्षांत आपल्या देशात  प्रवास आणि पर्यटन उद्योग अनेक पटीने वाढला असून त्यादृष्टीने ही पावले उचलण्यात आली आहेत. या वाढीमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे योगदान आहे आणि ग्राहकांच्या अनुभवाचा कल आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content