Homeचिट चॅटआज आयसीएसई दहावी...

आज आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावी परीक्षेचा निकाल

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी)च्या परीक्षेचा निकाल आज, रविवारी, १४ मे रोजी दुपारी ३ वाजता मंडळाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. काल संबंधित मंडळाकडून ही घोषणा करण्यात आली.

आयसीएसईमार्फत देश-विदेशातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावीची (आयसीएसई) परीक्षा २७ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. तर बारावीची (आयएससी) परीक्षा २९ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती. ती ३१ मार्चपर्यंत चालली होती. यावेळी मंडळाकडून सर्व विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटांचा अधिकचा वेळ देण्यात आला होता. यंदाच्या दहावी बारावीची या परीक्षेला देश विदेशातील परीक्षा केंद्रांवर सुमारे २.५ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content