Homeचिट चॅट९९एकर्स डॉटकॉमने लॉन्च...

९९एकर्स डॉटकॉमने लॉन्च केले ‘इनसाइट्स’ फीचर!

प्रॉपर्टी पोर्टल ९९एकर्स डॉटकॉमने ग्राहकांना प्रॉपर्टीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी अद्वितीय फीचर ‘इनसाइट्स’ लाँच केले आहे. हे नवोन्मेष्कारी रिअल इस्टेट इंटेलिजन्स सोल्यूशन ग्राहकांना परिसर, किंमती, रहिवाशांचे पुनरावलोकन याबाबत सर्वांगीण माहिती देत त्यांचा होम सर्च व संशोधन प्रवास एकसंघ करण्यास मदत करते.

प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणाऱ्या किंवा भाड्याने देणाऱ्या-घेणाऱ्या व्यक्तींना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यात अधिक प्रमाणात संशोधानाचा समावेश आहे आणि विश्वसनीय माहिती मिळण्यासंदर्भात मोठी समस्या आहे. ‘इनसाइट्स’ एक-थांबा सोल्यूशन आहे, जे ग्राहकांना भारतभरातील परिसर व गृहनिर्माण सोसायटींबाबत सविस्‍तर माहिती देते. त्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होते.

‘इनसाइट्स’ने लाखो ग्राहकांना त्यांच्या प्रॉपर्टी-संबंधित गरजांसंदर्भात मदत केली आहे. या वैशिष्ट्याला तीन लाख रहिवाशांकडून पुनरावलोकन मिळाले असून दर महिन्याला २०,००० रिव्ह्यूंची भर होत आहे. रेटिंग्ज व रिव्ह्यू ९,६०० परिसरांमधील व ४,६०० सोसायटींमधील रहिवाशांच्या वास्तविक, नि:पक्षपाती पुनरावलोकन देतात. त्यामधून त्यांचे फायदे व तोटे दिसून येतात. यामधून ग्राहकांना परिसर किंवा सोसायटीबाबत सखोल माहिती मिळते, जी अन्यथा त्यांना तेथे प्रत्यक्ष राहायला गेल्याशिवाय कळत नाही.

प्राइस ट्रेण्ड्स विद्यमान बाजारपेठ किंमत दाखवतात आणि परिसर/सोसायटी किंमतीमधील वाढ किंवा घट याबाबत माहितीदेखील देतात. तसेच, प्रॉपर्टी ट्रॅन्झॅक्शन प्राइसेसच्या माध्यमातून ग्राहक रजिस्ट्री नोंदीनुसार अलिकडील व्यवहार डेटा जाणून घेऊ शकतात आणि सर्वोत्तम डील करू शकतात. लोकॅलिटी इनसाइट्स सुरक्षितता, सुविधा, आगामी विकास आणि हॉस्पिटल्स, मेट्रो, मॉल्स इत्यादींप्रती कनेक्टिव्हीटी अशा घटकांवर परिसर व सोसायटींचे सर्वांगीण अवलोकन देते आणि ग्राहकांना सखोल माहिती मिळण्यास मदत करते.

इन्फोएजचे सीएमओ सुमीत सिंग म्हणाले की, ग्राहकांना प्रॉपर्टीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यास मदत करण्याचा आणि त्यांच्या गरजांची प्रभावीपणे पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही ग्राहकांना अचूक व पारदर्शक माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या होम सर्च व संशोधन प्रवासामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘इनसाइट्स’ लाँच केले. आम्हाला आतापर्यंत ‘इनसाइट्स’साठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, आम्ही या नवोन्मेष्कारी सोल्यूशनसह ग्राहकांना उत्तम सेवा देण्यामध्ये यशस्वी होऊ.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content