Homeचिट चॅटगल्ली फुटबॉलमधले तळमळीचे...

गल्ली फुटबॉलमधले तळमळीचे कार्यकर्ते सुरेंद्र करकेरांचे निधन

मुंबईच्या चाळींमध्ये राहणाऱ्या, गल्लींना फुटबॉलचे मैदान बनविणाऱ्या असंख्य गरीब आणि होतकरू खेळाडूंना बिपीन फुटबॉल ऍकॅडमीच्या माध्यमातून तळमळीने फुटबॉलचे प्रशिक्षण मिळावे म्हणून धडपडणारे फुटबॉलचे नि:स्वार्थी आणि सच्चे कार्यकर्ते सुरेंद्र करकेरा यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने काल सकाळी निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे मुंबई फुटबॉल जगताला जबर मानसिक धक्का बसला आहे.

गरीब-गरजू मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या तसेच बिपीन पुटबॉल ऍकॅडमीच्या माध्यमातून गेली 34 वर्षे सातत्याने आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या करकेरांबद्दल आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत साऱ्यांच्याच मनात आदराची भावना होती. करकेरा यांनी गेल्या चार दशकांत सामान्य फुटबॉलपटूंसाठी आपले आयुष्य वेचले.

खिशात पैसा नसतानाही ते स्वतः­च्या खिशातून केवळ पैसाच काढायचे नाही तर फुटबॉलच्या दात्यांकडून, सामाजिक आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडे झोळी पसरायचे. फुटबॉलची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या या कार्यकर्त्याने आपल्या उभ्या आयुष्यात अनेक गरीब-गरजूंना हात पकडून फुटबॉलचे प्रशिक्षण दिले. त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून रात्रशाळेत त्यांना दाखल केले. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटावा म्हणून अनेकांना हॉटेल-कंपन्यांमध्ये नोकरीला लावले. यातून त्यांनी अनेक फुटबॉलपटू घडवले.

करकेरांचा मुंबई फुटबॉलकडून गौरव

गरीब मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण मिळावे, त्यांच्यात फुटबॉलची आवड निर्माण व्हावी म्हणून गेली चार दशके बिपीन फुटबॉल ऍकॅडमीच्या माध्यमातून फुटबॉलची सेवा केल्याबद्दल सुरेंद्र करकेरा यांचा नुकताच मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

मुलाच्या स्मरणार्थ फुटबॉल प्रशिक्षणाचे आयोजन

आपला मुलगा बिपीन करकेराला रोव्हर्स कपचा सामना पाहायचा होता. पण तो सामना दाखवण्याआधी त्याचे अपघातात निधन झाले. बिपीनच्या निधनाचा करकेरांना खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. आपण मुलाची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, त्याचं प्रायश्चित म्हणून त्यांनी बिपीन मेमोरियल फुटबॉल स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेनिमित्त ते पूर्ण मुंबई आणि आसपासच्या उपनगरात तज्ज्ञ फुटबॉल प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे केंद्र तयार करायचे आणि प्रत्येक केंद्रात खेळाडूंना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जायचे. तसेच प्रत्येक केंद्राचा एक संघ तयार करून त्यांची फुटबॉल स्पर्धा आयोजित करायचे. हे गेले 34 वर्षे आपल्या मुलाच्या स्मरणार्थ मोठ्या तळमळीने करत होते. त्यांच्या निधनामुळे बिपीन फुटबॉल ऍकॅडमी आणि गरीब-होतकरू फुटबॉलपटूंना खूप मोठा धक्का बसला आहे.

फुटबॉलचा धडपड्या गेला

करकेरांची धडपड पाहून सर्वांनाच वाटायचे की आपण त्यांना मदत करायला हवी. त्यांना सर्वच मोठ्या मनाने मदत करायचे. त्यांची फुटबॉल आणि गरीब मुलांबाबत असलेली तळमळ पाहून आम्ही कर्नाटक स्पोर्टस् क्लबचे मैदान अगदी माफक दरात कायमस्वरूपी उपलब्ध करून दिले. तो ज्या तळमळीने फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करायचा, त्याच्या धडपडीला सलाम. त्याच्या निधनानंतर बिपीन ऍकॅडमी आणि गरीब फुटबॉलपटू पोरके झाले आहेत, अशा भावना ज्येष्ठ क्रीडा संघटक जया शेट्टी यांनी व्यक्त केल्या आहेत.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content