Homeचिट चॅटप्रजासत्ताकदिनाचा सोहळा पाहा...

प्रजासत्ताकदिनाचा सोहळा पाहा तिकिटे ऑनलाईन खरेदी करून!

प्रजासत्ताकदिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी, यापुढे  मान्यवरांना/पाहुण्यांना ई-आमंत्रणे आणि तिकिटांची ऑनलाईन विक्री करण्यासाठी, सरकारच्या ई-प्रशासन उपक्रमाचा एक भाग म्हणून, एका ऑनलाईन आमंत्रण व्यवस्थापन पोर्टलचा (www.aamantran.mod.gov.in) प्रारंभ संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी काल नवी दिल्ली येथे केला.

हे पोर्टल मान्यवरांना आणि पाहुण्यांना ऑनलाईन प्रवेशिका जारी करण्याची सुविधा प्रदान करते आणि कोणत्याही भौगोलिक स्थानावरून सर्वसामान्यांना ऑनलाईन तिकीट खरेदी करण्याची तरतूद या पोर्टलमध्ये करण्यात आली आहे. हे आमंत्रण पोर्टल, संपूर्ण प्रक्रिया वापरणाऱ्याला सोयीची, पर्यावरणस्नेही बनवेल तसेच सरकार आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी करेल. याची तपशीलवार प्रक्रिया खालील दुव्याच्या माध्यमातून पाहता येईल.

हे पोर्टल म्हणजे ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमातील आणखी एक मैलाचा दगड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, सोपे, प्रभावी, आर्थिक आणि पर्यावरणस्नेही प्रशासनावर आधारित असलेल्या ई-प्रशासन मॉडेलच्या संकल्पनेच्या दिशेने एक पाऊल आहे, असे यावेळी अजय भट्ट यांनी सांगितले. या निमंत्रण पोर्टलमुळे लोकांना प्रजासत्ताकदिन सोहळ्यानिमित्त (RDC) तिकिटे खरेदी करणे सोपे होईल आणि छपाईसाठी वापरल्या जाणार्‍या कागदाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. या पोर्टलमुळे प्रजासत्ताकदिन सोहळा (RDC) अधिक सुरक्षित पद्धतीने साजरा होईल.

आमंत्रण (Aamantran) पोर्टलमध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत:

  • सुरक्षा अधिक बळकट होण्यासाठी क्यू आर (QR) कोड-आधारित प्रमाणीकरण.
  • ईमेल/एसएमएसद्वारे पास/तिकिटांचे डिजिटल वितरण.
  • रद्द न करता येणारी आणि अहस्तांतरणीय तिकिटे.
  • निमंत्रितांकडून स्वीकृती मिळविण्यासाठी पाससाठी आरएसव्हीपी (RSVP) पर्याय.
  • भविष्यातील इतर कार्यक्रमांच्या चांगल्या नियोजनासाठी कार्यक्रमानंतरच्या डेटाचे विश्लेषण करणे शक्य होणार.

या पोर्टलद्वारे ई-आमंत्रण पत्रिकेचे वाटप करण्याव्यतिरिक्त, तिकिटांच्या खरेदीसाठी खालील ठिकाणी बूथ/काउंटर स्थापित केले जातील, जिथे संरक्षण मंत्रालयाद्वारे ऑनलाईन तिकिटांची सोय उपलब्ध केली जाईल.

  • सेना भवन (प्रवेशद्वार क्रमांक 2)
  • शास्त्री भवन (प्रवेशद्वार क्रमांक 3)
  • जंतरमंतर (मुख्य प्रवेशद्वारा जवळ)
  • प्रगती मैदान (प्रवेशद्वार क्रमांक 1)
  • संसद भवन (स्वागत कार्यालय) – खासदारांसाठी विशेष काउंटर (18.01.2023 रोजी उघडेल)

यासाठीची वेळ सकाळी (10 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत) आणि दुपारी (2 ते 4.30 वाजेपर्यंत) असेल. या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी, www.mod.gov.in, www.indianrdc.mod.gov.in. या संकेतस्थळाला भेट द्या.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content