Homeचिट चॅटभारतीय लष्करातर्फे उद्या...

भारतीय लष्करातर्फे उद्या 33 शहरांमध्ये रक्तदान शिबीर

भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त देशभर साजऱ्या होत असलेल्या, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून आणि 15 जानेवारी 2023 रोजी बंगळूरू येथे साजऱ्या होणार्‍या लष्कर दीना निमित्त, भारतीय लष्कराने उद्या, 24 डिसेंबर 22 रोजी प्रथमच, अकरा राज्यांमधील तेहतीस शहरांमध्ये रक्तदान मोहिमेचे आयोजन केले आहे.

या दिवशी भारतीय लष्कराचे जवान आणि त्यांचे कुटुंबीय मानवी प्राण वाचवण्यासाठी ऐच्छिक रक्तदान करणार आहेत. यावेळी संकलित झालेले रक्त आणि रक्तघटक गरजू रुग्णांपर्यंत वेळेवर पोहोचावे, यासाठी भारतीय लष्कर, ही मानवतावादी मोहीम प्रमुख सरकारी रुग्णालये आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयाने राबवत आहे. 

‘रक्तदान करा – प्राण वाचवा’ या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेली ही रक्तदान शिबिरे 15 जानेवारी 23 रोजी होणाऱ्या 75व्या लष्कर दिनानिमित्त लष्कराच्या दक्षिण कमांडतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या इतर विविध कार्यक्रमांचा एक भाग आहेत. भारतीय सैन्याची,  ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून 7,500 युनिट रक्ताची व्यवस्था करण्याची आणि आपत्कालीन परिस्थितीत रक्तदान करण्यासाठी, त्या दिवशी 75,000 स्वयंसेवकांची डेटा बँक तयार करण्याची योजना  आहे.

या शिबिरामध्ये लष्कराचे जवान, त्यांचे कुटुंबीय, एनसीसी कॅडेट, नागरी संरक्षण कर्मचारी, आर्मी पब्लिक स्कूलचे शिक्षक आणि समाजाच्या सर्व स्तरांमधील निरोगी स्वयंसेवक रक्तदान करतील. ही शिबिरे दक्षिण कमांडच्या अखत्यारीतील सर्व मोठ्या शहरांमध्ये आणि दुर्गम भागांमध्ये आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, पणजी, जोधपूर, जैसलमेर, भुज, नाशिक, अहमदनगर, भोपाळ, झाशी, नासिराबाद, सिकंदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई या आणि अन्य शहरांचा समावेश आहे.

पुण्यामध्ये कमांड हॉस्पिटल पुणे, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस), लष्करी रुग्णालय खडकी आणि लष्करी रुग्णालय खडकवासला या चार प्रमुख ठिकाणी रक्तदान शिबीरे आयोजित केली जाणार असून या अंतर्गत, केवळ एका दिवसात सुमारे 500 युनिट रक्त संकलित केले जाणार आहे. राष्ट्र उभारणीच्या मोठ्या जबाबदाऱ्यांचा एक भाग म्हणून, भारतीय लष्कर आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. या रक्तदान मोहिमेमुळे समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिक, विशेषतः युवा वर्गाला त्यांचे समाजाप्रति असलेले कर्तव्य बजावण्याची आणि अमूल्य प्राण वाचवणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल.

Continue reading

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...
Skip to content