Homeचिट चॅटनाताळाच्या पार्श्वभूमीवर दिसले...

नाताळाच्या पार्श्वभूमीवर दिसले सँटा छगन भुजबळ!

पांढऱ्या दाढीत व्यवस्थित वेशभूषा केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा नाताळाच्या पार्श्वभूमीवर सँटाक्लॉज केल्याचे मोबाईलमधील छायाचित्र राष्ट्रवादीचेच जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दाखवले आणि सदस्यांमध्ये एकच खसखस पिकली. भुजबळ यांचे हे छायाचित्र मूळ छायाचित्र नसून आपल्याच सभागृहाचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य अतुल भातखळकर यांनी मॉर्फ करून ते तयार केले आहे. त्यांनी हा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल भातखळकर यांच्याविरूद्ध काय कारवाई करणार, असा सवाल पाटील यांनी केल्याने त्यात अधिकच रंगत आली.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलांची मॉर्फ केलेली छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सदस्य मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांना निलंबित करण्यात येईल, तर पोलिस निरीक्षकाची बदली करण्यात येईल, असे त्यांनी घोषित केले.

महिलांवरील अत्याचार रोखणे आणि त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात विशाखा समिती गठित करणे आवश्यक आहे. अद्याप ज्या कार्यालयांनी ही कार्यवाही केलेली नसेल त्यांनी विशाखा समिती गठित करून तसा फलक ठळकपणे लावण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही ते म्हणाले.

त्यानंतर जयंत पाटील यांनी भुजबळ यांचा विषय उपस्थित केला. त्यावर हसतहसत उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, याप्रकरणी घटनेची सत्यता पडताळून पाहिली जाईल. त्यात कोणी तक्रारदार आहे का हे बघितले जाईल आणि त्यात अश्लिलता आहे का, हेही पाहिले जाईल. यातला गमतीचा भाग सोडला तरी राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करू नये. त्यांनी सोशल मीडियावर संहिता पाळाव्यात.

कोंबडी, अंडे आणि सभागृह…

मुंबईचा सोन्याचे अंडे देणारी कोंबडी… असा उल्लेख छगन भुजबळ यांनी केल्याने विधानसभेत बुधवारी गदारोळ झाला. भाजपा सदस्या मनीषा चौधरी यांनी त्याला आक्षेप घेतल्यावर भुजबळ यांनी त्यांना ए बस्स खाली…असे ओरडून सांगितले. त्याला भाजपा सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत भुजबळ यांचे भाषण रोखले. अखेर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.

पण, त्यानंतर योगेश सागर यांनी हा मनीषा चौधरी यांचा, महिलेचा अपमान असून भुजबळ यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी सरस्वतीचाही अपमान केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरही पवार यांनी त्यांच्यावतीने दिलगिरी व्यक्त केली. मात्र, त्यानंतर भुजबळ यांनी थेट राज्यपालांनाच यात ओढले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल घाणेरडी विधाने केली, असा उल्लेख भुजबळ यांनी करताच त्यावरून भाजपा सदस्यांनी विरोध करून आक्षेप घेतला आणि दोन्ही बाजूंनी घोषणा दिल्या गेल्याने सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.  

हल्ली देशात सहिष्णुता राहिलेली नाही, अशी टीका केली जाते. त्यासाठी दाखलेही दिले जातात. पण, मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या म्हणी आणि वाक्प्रचार यांच्याबद्दलचे ज्ञान नसणे, माहिती नसणे किंवा माहिती असूनही वेड पांघरून पेडगावला जाणे, असा प्रकार एखादी गोष्ट म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी…, या वाक्प्रचारावरून झाला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ माजला. अखेर छगन भुजबळ यांच्यावतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर दिलगिरी मागण्याची वेळ आली. पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी मुंबई शहराचा उल्लेख सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, असा केला होता.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content