Homeचिट चॅट‘बकार्डी एनएच७ वीकेण्‍डर’चे...

‘बकार्डी एनएच७ वीकेण्‍डर’चे पुण्यात पुनरागमन; उद्यापासून आयोजन!

भारतातील उत्साहपूर्ण बहु-शैली संगीत फेस्टिवल ‘बकार्डी एनएच७ वीकेण्डर’ प्रेक्षकांना यंदाच्या सर्वात प्रभावी लाइन-अप्ससह मंत्रमुग्ध करण्यास सज्ज आहे. हा फेस्टिवल, त्याचे होमग्राऊंड पुणे येथे उद्यापासून, २५ ते २७ नोव्हेंबर २०२२पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

थीम ‘#१३मेरावीकेण्डर अंतर्गत १३व्या पर्वासाठी परतत असलेला बकार्डी एनएच७ वीकेण्डर भारतातील बहुप्रतिक्षित फेस्टिवल आहे आणि वर्षानुवर्षे या फेस्टिवलची लोकप्रियता व उपस्थिती वाढत आहे.

‘ग्लॅस्टनबरीला भारताचे उत्तर’ म्हणून ओळखले जाणारा, बकार्डी एनएच७ वीकेण्डरने यावर्षी चाहत्यांसाठी काही आश्चर्यकारक गोष्टी आणणार आहे. स्वीडिश जॅझ, आरअॅण्डबी/सोल, पॉप बॅण्ड डर्टी लूप्ससह प्रसिद्ध अमेरिकन फोक रॉक बॅण्ड द ल्युमिनियर्स पहिल्यांदाच आशियाई मंचावर त्‍यांचे हेडलाइनर अॅक्ट्स सादर करणार आहे. तसेच पॉवरहाऊस डीमव्हीले क्रूचा अमेरिकन रॅपर जे.आय.डी. त्याच्या नवीन हिप-हॉप अल्‍बमसह मंचावर धुमाकूळ घालेल. या लाइन-अपमध्ये दुसरा हिप-हॉप आकर्षण आणि टॉप १० युके चार्ट सिंगलमध्ये स्थान असलेला भारतीय वंशाचा पहिला रॅपर पीएव्ही४एन, तसेच पॉवर-पॅक इस्रायली एक्स्पेरिएन्शियल रॉक बॅण्ड टायनी फिंगर्स यांचादेखील समावेश आहे.

४०हून अधिक स्थानिक व जागतिक कलाकारांचा समावेश असलेल्या या फेस्टिवलमध्ये ब्लडीवुड, द एफ१६एस, यशराज आणि हनुमानकाइंड या भारतीय कलाकारांचे उत्साहवर्धक परफॉर्मन्स पाहायला मिळतील. पाच टप्पे विविध प्रकारच्या शैलींसोबत हाय एनर्जी हिप-हॉप अॅक्ट्स ते सोल-स्टिअरिंग बॅलार्डसना सादर करतील, ज्यामध्ये भारतीय कलाकारांसह क्रस्ना, सेझ अॅण्ड द एमव्हीएमएनटी, शाश्वत बुलुसू, रेबल, झॅली, मेनी रूट्स एन्सेम्बल, एमसी अल्‍ताफ (लाइव्ह), अनुमिता नादेसन, द डाऊन ट्राडेन्स, द दर्शन दोशी ट्रिओ फीट हॅशबास अॅण्ड रिकराज नाथ, अनुव जैन व रामण नेगी यांचा समावेश असेल.

उत्साहपूर्ण मनोरंजन सादर करण्याच्या आपल्‍या परंपरेशी बांधील राहत या फेस्टिवलमध्ये पहिल्यांदाच काही पाहण्यासारखे परफॉर्मन्स आहेत, जसे रूडी मुक्ता, दोहनराज अॅण्ड द पेक्युलिअर्स, पीके, उत्सवी झा, करश्नी, आदी, गौरी व अक्षा, वेल्वेट मीट्स ए टाइम ट्रॅव्हलर, वाइल्ड वाइल्ड विमेन, डॅप्पेस्ट+ आदी, फॉक्स इन द गार्डन, पर्प एक्स लिन्फॉर्मेशन, साची आणि मेबा ऑफिलिया.

नॉडविन गेमिंगचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले की, बकार्डी एनएच७ वीकेण्डर, हा पहिला व सर्वात महत्त्वाचा संगीत आणि कलेचा उत्सव आहे. ए. आर. रहमान, स्टीव्ह वाय, जो सॅट्रियानी, मेगाडेथ, कोडालिन, स्टीव्हन विल्सन, सिगारेट्स आफ्टर सेक्स, चेट फेकर आणि इतर जागतिक शोस्टॉपर्स यासारखे जगप्रसिद्ध कलाकार आमच्याशी संलग्न आहेत, जे न्युक्लिया, रित्विज, प्रतीक कुहड, डिवाइन, द लोकन ट्रेन अशा भारतीय इंडी हार्टथ्रोब्सप्रमाणेच एकाच मंचावर परफॉर्मन्स सादर करतात. हे खरोखरंच भारतातील संगीतक्षेत्रासाठी एक संगमाचे ठिकाण आहे. यावर्षीच्या एनएच७ वीकेण्डरची थीम # १३मेरावीकेण्डर आहे आणि आम्ही पुन्हा एकदा चाहत्यांना सिग्नेचर वीकेण्डर अनुभव देण्यासाठी सज्ज आहोत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content