Homeचिट चॅटनेपाळमधल्या निवडणुकांसाठी भारताचे...

नेपाळमधल्या निवडणुकांसाठी भारताचे आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक!

नेपाळमधल्या आगामी  प्रतिनिधीगृह आणि प्रांतीय विधानसभेच्या निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणून भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नेपाळच्या 275 सदस्यांच्या प्रतिनिधीगृह निवडणुकीसाठी आणि सात प्रांतीय विधानसभांच्या 550 जागांसाठी येत्या 20 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे.

राजीव कुमार, 18 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2022 दरम्यान नेपाळमध्ये राष्ट्रीय अतिथी म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्त्व करतील. या दौऱ्यात ते काठमांडू आणि जवळच्या परिसरातील मतदारसंघांना भेट देतील. भारतीय निवडणूक आयोगदेखील अशाच प्रकारचा आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम राबवत असते,  ज्यामध्ये इतर निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील सदस्यांना वेळोवेळी होणाऱ्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले जाते.

द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय स्तरावर परस्परसंवादाद्वारे लोकशाहीचा जगभर प्रसार करण्यासोबतच लोकशाहीच्या  मुल्यांना आणि प्रक्रियांना बळकटी देण्यासाठी एकमेकांशी संपर्क राहावा या उद्देशाने तसेच ज्ञानाची आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून नेहमीच असे प्रयत्न केले जातात.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content