Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्री ठाकरेंनी संपत्ती...

मुख्यमंत्री ठाकरेंनी संपत्ती दडपली?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती दडपली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीची प्रत्यक्ष कागदपत्रांसमोर/करारपत्रांबरोबर पडताळणी केली असता हे साफ दिसून येत आहे, अशी तक्रार  भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. किरीट सोमैया यांनी आयकर विभागाकडे केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी दडपलेल्या संपत्तीसंदर्भात निवडणूक आयोग, दिल्ली येथे तक्रार दाखल केल्यानंतर आज 8 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाच्या इन्वेस्टिगेशन विंगच्या महासंचालक भानुमती यांच्याकडे तक्रार दाखल करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे खरेदीमूल्य रू. 4,37,00,000 दाखवले आहे. पण करारामध्ये बाजारमूल्य रु. 4,14,00,000 असल्याचे दिसून येते. परंतूखरेदी मूल्य रु.2,10,00,000 असल्याचे दिसून येते. रश्मी उद्धव ठाकरे यांनी 19 घरांचा (एकूण 23,500 स्क्वे. फूट बांधकाम)8 वर्षांचा (1/4/2013 ते 31/3/2021पर्यंत) प्रॉपर्टी टॅक्स/कर 12 नोव्हेंबर 2020 रोजी भरला. ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार एकूण संपत्तीचे बाजारमूल्य रु. 5,29,00,000 आहे. अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोर्लाई, अलिबाग येथे रु. 10.50 कोटी रुपयांची जमीन व मालमत्ता आहे. पण सांपत्ती/मालमत्तेची किंमत व मूल्य रु. 2.10 कोटी एवढीच दाखवली आहे, असे सोमैया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content