Homeचिट चॅटडॉ. आंबेडकरांच्या 'राजगृहा'समोरच्या...

डॉ. आंबेडकरांच्या ‘राजगृहा’समोरच्या पालिका उद्यानात मोफत वाचनालय

मुंबईच्या दादरमधील हिंदू कॉलनीत बी. एन. वैद्य उद्यानात कॉर्पोरेट सामाजिक दायित्‍व (CSR)च्‍या माध्‍यमातून नुकतेच मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादरमध्ये खास वैयक्तिक ग्रंथालयाकरीता ‘राजगृह’ या बंगल्याच्या रूपाने निवासस्थान बांधले होते. या राजगृहासमोरच हे उद्यान आहे.

या खास वाचनालयाच्या शुभारंभप्रसंगी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

वाचनालय

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या उद्यान विभागामार्फत विविध उद्यानांमध्‍ये कॉर्पोरेट सामाजिक दायित्‍वाच्‍या माध्‍यमातून, महानगरपालिकेच्‍या २४ प्रशासकीय विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे २४ वाचनालय टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. या शृंखलेतील तिसऱ्या वाचनालयाचा प्रारंभ आता झाला आहे. याबाबत अधिक माहिती देताना उद्यान अधीक्षक परदेशी यांनी सांगितले की, आजच्‍या सोशल मीडिया आणि मोबाईलच्‍या दुनियेत हरविलेल्‍या नव्‍या पिढीला वाचनामध्‍ये रस निर्माण करून एक समृद्ध समाजनिर्मितीचा आमचा प्रयत्‍न आहे. या वाचनालयांमध्‍ये विविध महापुरुषांची जीवनचरित्रे, इतिहास, निसर्गविषयक, वृक्ष-फुले-फळे, आरोग्‍य, चांगली जीवनशैली अशा निरनिराळ्या विषयांची पुस्तके समाविष्ट आहेत.

लहानग्‍यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्‍हावा, या हेतूने विविध बोधपर गोष्‍टी तसेच खेळ आणि व्‍यायामाविषयी आवड निर्माण व्‍हावी म्‍हणून त्‍या संदर्भातील पुस्‍तकेही या वाचनालयांमध्‍ये उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानवंत आणि पुस्तकप्रेमी. राजगृहातील त्यांचे ग्रंथालयदेखील खासच. त्यामुळे बाबासाहेबांच्या निवासस्थानासमोर उद्यानात सुरू केलेले मोफत वाचनालय हे वाचनप्रेमींना विशेषतः विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content