Homeचिट चॅटइजिप्तमधल्या नेमबाजीत रुचिता...

इजिप्तमधल्या नेमबाजीत रुचिता विनेरकर, निवेथा, इशा सिंगला सुवर्णपदक!

इजिप्तमधील कैरो येथे २८ फेब्रुवारी ते ८ मार्च या दरम्यान आयोजिलेल्या नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत मराठमोळ्या रुचिता विनेरकर आणि तिच्याबरोबरच्या निवेथा आणि इशा सिंग यांनी स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

रुचिता मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर रायफल क्लबच्या सदस्य असून त्यांच्या या कामगिरीमुळे सावरकर स्मारकाच्या रायफल क्लबची कामगिरी आता अधिक उंचावली आहे.

रुचिता

रुचिता विनेरकर रेल्वेच्या कर्मचारी असून सावरकर रायफल क्लबमध्ये नियमित सरावासाठी येतात. गुरुवार, ३ मार्चला त्यांनी एअर पिस्तुल प्रकारातील सांघिक स्पर्धेत केलेल्या स्पृहणीय कामगिरीमुळे भारतीय संघ सुवर्णपद मिळवू शकला. भारताच्या या महिला त्रिकुटाने १६ अचूक लक्ष्यवेध करताना भारताच्या खात्यावर दुसरे सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक जमा केले. दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदकासह भारतीय संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे..

यानिमित्ताने सावरकर स्मारकाच्यावतीने रुचिता विनेरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर तसेच रायफल क्लबचे विश्वजीत शिंदे यांनी दिली. हा समारंभ सावरकर स्मारकाच्या सभागृहात आज, रविवारी ६ मार्चला होत आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content